11 December 2024 7:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

5 Business Idea For Women | गृहिणींनो घरबसल्या हे टॉप 5 घरगुती उद्योग सुरू करू शकता; महिना 15 ते 25 हजार रुपये कमवा

5 Business Idea

5 Business Idea For Women | आज काल बहुतांश महिला शिक्षण घेऊन नोकरी आणि घर दोन्हीही सांभाळतात परंतु बऱ्याच मध्यमवर्गीय घरांमध्ये महिलांना बाहेर नोकरी करण्याची संधी किंवा मुभा मिळत नाही. बऱ्याच महिलांची नोकरी करून पैसे कमवण्याची इच्छा तर असते परंतु घर, सासू सासरे, नवरा, मूलबाळ या सर्व घोळक्यातून गृहिणीला घराबाहेर पडून नोकरी करण्यासाठी वेळ मिळत नाही. म्हणूनच आज आम्ही खास करून गृहिणींसाठी एकूण 5 असे बिजनेस आयडिया घेऊन आलो आहोत ज्याच्या पद्धतीने गृहिणी देखील घरबसल्या 15 ते 25 हजार रुपये प्रत्येक महिन्याला कमवू शकते.

1. शिवणकाम :

सध्या मार्केटमध्ये प्रत्येक ऋतूप्रमाणे वेगवेगळ्या कॉटन कपड्यांमध्ये आणि वेगवेगळ्या क्वालिटीचे वूमन फ्रॉक्स, लॉन्ग कुर्ता आणि इतरही हँडमेड कपड्यांना भरपूर प्रमाणात डिमांड आली आहे. बहुतांश महिलांना शिवणकाम येत असते. त्यामुळे तुम्ही तुमची कला घरबसल्या वाया जाऊ देऊ नका. तुम्ही घरात बसून सुद्धा तुमची कला सादर करून कपडे विकू शकता. सध्याचे जग अतिशय वास्ट झाले आहे त्यामुळे या डिजिटल युगात तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देखील तुमचे कपडे विक्रीसाठी ठेवू शकता.

2. बेकरीचे पदार्थ बनवणे :

कोरोना काळापासून घरगुती व्यवसायांना जास्तीत जास्त डिमांड आली आहे. खास करून बेकरीचे व्यवसाय तुफान चालले आहेत. तुम्ही घरगुती केक तयार करून बाजारात विकू शकता. सध्या सोशल मीडियावर चीज केक बनवून विकणाऱ्या बऱ्याच लघु उद्योजकांचे व्हिडिओ तुफान वायरल होत असताना पाहायला मिळत आहेत. तुम्ही सुद्धा असाच काहीसा बेकरी व्यवसाय सुरू करून महिन्याला 5 ते 7 हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकता. समजा तुमचा बिजनेस तुफान चालला तर, तुम्ही महिन्याला 25 ते 30 हजारांच्या घरात पगार घेऊ शकता.

3. सोशल मीडिया :

सध्या बराच तरुणवर्ग सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवत आहे. गृहिणींकडे बऱ्यापैकी कुकिंग स्किल्स असतात. त्यामुळे तुम्ही सुंदर अशा रुचकर रेसिपींचे व्हिडिओज बनवून youtube चायनल उघडून पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला एक सुंदर असा घरामध्ये सेटअप तयार करून घ्यावा लागेल.

4. कापडी पिशवी :

ज्या महिलांना शिवणकाम उत्तम जमते त्यांनी कपड्यांबरोबर वेगवेगळ्या डिझाईनच्या कापडी पिशवी शिवण्याचा बिझनेस देखील सुरू केला पाहिजे. कारण की प्लास्टिक बंदीनंतर कापडी पिशव्यांची मोठी मागणी मार्केटमध्ये केली जाते. तुमच्या उत्तम कामामुळे तुम्हाला नवनवीन ऑफर्स देखील मिळू शकतील आणि तुम्ही घरबसल्या महिन्याला 30,000 हजारो रुपयांची कमाई करू शकता.

5. घरपोहोच जेवणाचे डबे :

शहरी भागांमध्ये बहुतांश व्यक्ती कामानिमित्त किंवा विद्यार्थीवर्ग शिक्षणासाठी बॅचलर म्हणून राहण्यासाठी आलेले असतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांना अभ्यास आणि कामाच्या वेळा सांभाळताना घरी जेवण बनवायला वेळ मिळत नाही. त्यामुळे दररोज बाहेरचं खाणं देखील खिशाला परवडत नाही. अशावेळी घरगुती डब्यांचा बिझनेस तुफान चालू शकतो. यासाठी तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट वाढवावा लागेल आणि ग्राहक गोळा करावे लागतील. जेणेकरून तुमचा घरगुती डब्यांचा बिझनेस देखील तुफान चालेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | 5 Business Idea For Women Tuesday 10 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#5 Business Idea(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x