3 December 2024 10:54 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-57

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणत्या रणजी संघाने सलग दुसऱ्यांदा रणजी पाठोपाठ इराणी चषक जिंकण्याची कामगिरी करून दाखविली आहे?अ) सौराष्ट्रब) मुंबईक) कर्नाटकड) विदर्भ
प्रश्न
2
विवेक पोंक्षे यांचे नुकतेच निधन झाले…………अ) ते ‘ई-प्रशिक्षक’ या मासिकाचे संपादक होते.ब) ‘साखरशाळा’, ‘ग्रामीण प्रज्ञा विकास योजना’ या योजना अंमलबजावणीत त्यांचा पुढाकार होता.क) ते जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि ज्ञानप्रबोधिनीचे जेष्ठ कार्यकर्ते होते.
प्रश्न
3
दिवंगत चित्रपट दग्दर्शक मृणाल सेन यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?अ) पद्मभूषण पुरस्कार – १९८१ब) दादासाहेब फाळके पुरस्कार – २००३क) फ्रान्स सरकारचा ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स (१९८५)ड) रशियाचा ऑर्डर ऑफ फ्रेंडशीप (२०००)
प्रश्न
4
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या संदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.अ) २००० साली ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले होते.ब) मार्च २०१७ मध्ये ते नव्याने गोव्याचे मुख्यमंत्री झाले होते.
प्रश्न
5
मृणाल सेन यांच्या संदर्भात अयोग्य पर्याय निवडा.अ) १९९८ ते २००३ दरम्यान ते राज्यसभा सदस्य होते.ब) २०१७ साली त्यांना ऑस्कर अकादमीवर सदस्य म्हणून नेमले गेले होते.क) ते एफ. टी. आयचे माजी अध्यक्ष होते.ड) त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले होते.
प्रश्न
6
श्रीधर माडगुळकर यांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.अ) २१ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांचे निधन झाले.ब) ते ग. दि. माडगुळकरांचे पुत्र होते.क) ‘मंतरलेल्या आठवणी’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.
प्रश्न
7
२०१९ च्या लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड संदर्भात योग्य पर्याय निवडा.अ) यावर्षी पुरस्कार जिंकून सर्बियाच्या नोवाक जोकोविचानेउसेन बोल्टची बरोबरी केली.ब) महिलांमध्ये अमेरिकेची जिम्नॅस्टिक खेळाडू सिमोन बाईल्स हिला पुरस्कार दिला गेला.
प्रश्न
8
योग्य पर्याय निवडा.अ) पहिल्या आशियाई खेळांचे आयोजन भारतात नवी दिल्ली येथे केले गेले होते.ब) या स्पर्धा १९५१ साली आयोजित केल्या गेल्या.
प्रश्न
9
स्थलांतरितांबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी खालीलपैकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन पाळला जात असतो?
प्रश्न
10
मनोहर पर्रीकर यांच्या संदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय ओळखा.अ) १७ मार्च २०१९ रोजी त्यांचे निधन झाले.ब) गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावर काम करणारे ते १० वे मुख्यमंत्री होते.क) १९९१ साली प्रथम ते गोव्याचे विरोधी पक्ष नेते झाले होते.
प्रश्न
11
योग्य पर्याय ओळखा.अ) गॉर्डन बॅक्स यांचे ८१ व्या वर्षी निधन झाले ते फुटबॉलपटू होते.ब) बॅक्स हे इंग्लंडच्या फुटबॉल संघात गोलरक्षक होते.क) इंग्लंडने आजवर जिंकलेल्या एकमेव फुटबॉल विश्वचषक विजेत्या संघाचे जे सदस्य होते.
प्रश्न
12
उत्तम पाचरणे यांच्या संदर्भात विधाने वाढून योग्य पर्याय ओळखा.अ) ते जेष्ठ शिल्पकार व चित्रकार आहेत.ब) ते राष्ट्रीय ललित कला अकादमीचे अध्यक्ष आहेत.क) १७ मे २०१८ पासून ते या पदावर आहेत.
प्रश्न
13
अजित सावंत यांचे नुकतेच निधन झाले………..अ) ते राजकीय नेते होते.ब) ‘उठाव झेंडा बंडाचा’ या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले होते.क) मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले होते.
प्रश्न
14
डॉ. ए. के. मोहंती यांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.अ) डॉ. अजित कुमार मोहंती हे त्यांचे नाव आहे.ब) ते मूळ ओडीशाचे आहेत.क) त्यांना १९९८ चा पद्मश्री पुरस्कार दिला गेला होता.
प्रश्न
15
लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड संदर्भात योग्य पर्याय निवडा.अ) वैयक्तिक पुरुष, महिला आणि संघ यांच्या मागील वर्षाच्या कामगिरीचा विचार करून हा पुरस्कार दिला जातो.ब) १९९९ साली या पुरस्काराची स्थापना झाली.
प्रश्न
16
डॉ. जी. सी. अनुपमा यांच्या संदर्भात योग्य पर्याय ओळखा.अ) अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया या नामांकित संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.ब) याआधी त्या आय. आय. एस. सीच्या अॅस्ट्रोफिजिक्स संस्थेच्या अधिष्ठाता आणि वरिष्ठ प्राध्यापक होत्या.क) त्यांना वर्ष २००० मध्ये सर सी. व्ही. रामन पुरस्काराने सन्मानित केले गेले होते.
प्रश्न
17
योग्य पर्याय ओळखा.अ) सत्यरूप सिद्धांत हा गिर्यारोहक आहे.ब) ७ वर्षांमध्ये ७ खंडातील ७ सर्वोच्च शिखरे आणि ७ ज्वालामुखी शिखरे सर करणारा तो जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक ठरला आहे.
प्रश्न
18
योग्य विधान ओळखा.अ) २०१९ चा रणजी चषक विदर्भाने जिंकला.ब) रणजी पाठोपाठ या वर्षी इराणी चषक जिंकण्याची कामगिरी विदर्भाने केली.क) अशी कामगिरी विदर्भाने सलग दुसऱ्या वर्षी केली आहे.
प्रश्न
19
खालीलपैकी कोणास यावर्षी शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले गेले?अ) स्मृती मनधाना – क्रिकेटब) मोनिका आथरे – धावपटूक) उत्कर्ष काळे – कुस्तीपटूड) नेहा पंडित – बॅडमिंटनइ) सायली केरिपाळे – कबड्डी
प्रश्न
20
न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या संदर्भात अयोग्य पर्याय निवडा.अ) २००७ साली त्यांना पद्मविभूषणने सन्मानित केले गेले.ब) २००३ साली पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले.क) २००१ च्या कोल्हापूर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
प्रश्न
21
डॉ. ए. के. मोहंती यांना खालीलपैकी कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत?अ) इंडियन फिजिक्स सोसायटीचा यंग फिजीस्त अवॉर्ड (१९८८)ब) इंडियन सायन्स नॅशनल अकडमीचा यंग सायन्टीस्ट अवॉर्ड (१९९१)क) अणूउर्जा विभागाचा होमी भाभा पुरस्कार (२००१)
प्रश्न
22
२०१९ या वर्षी राष्ट्रीय बॅटमिंटन स्पर्धेचे महिला गटातील विजेतेपद कोणी पटकाविले?
प्रश्न
23
डॉ. गोंविंद स्वरूप यांच्या संदर्भात योग्य पर्याय ओळखा.अ) त्यांना भारतीय रेडीओ खगोल भौतिकीशास्त्राचे जनक मानले जाते.ब) त्यांचा जगातील सर्वात मोठ्या रेडीओ टेलिस्कोप उभारणीत सहभाग होता.क) ‘वन्स अपॉन अ ट्राय’ या गुगलच्या ऑनलाईन प्रदर्शनात त्यांचा सहभाग करून गुगलने त्यांचा सन्मान केला आहे.
प्रश्न
24
एशियन गेम्स संदर्भात योग्य पर्याय निवडा.अ) दर चार वर्षांनी आयोजन केले जाते.ब) आशियाई ऑलीम्पिक परिषदेकडून आयोजन केले जाते.
प्रश्न
25
मृणाल यांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.अ) ३० डिसेंबर २०१८ रोजी त्यांचे निधन झाले ते चित्रपट दिग्दर्शक होते.ब) ‘रात भोरे’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता.क) ‘आमार भुवन’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

राहुन गेलेल्या बातम्या

x