12 December 2024 10:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL

RVNL Share Price

RVNL Share Price | गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. कारण आरव्हीएनएल कंपनीने स्टॉक मार्केटला फाइलिंगमध्ये मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची माहिती दिली आहे. याशिवाय ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी आरव्हीएनएल शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत, तसेच शेअरची पुढची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

आरव्हीएनएल शेअरची सध्याची स्थिती

गुरुवारी दुपारच्या ट्रेडिंग सेशन्समध्ये स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी आरव्हीएनएल शेअर 0.095 टक्के घसरून 473.80 रुपयांवर पोहोचला होता.

आरव्हीएनएल कंपनीला मिळाला कॉन्ट्रॅक्ट

आरव्हीएनएल कंपनीने स्टॉक मार्केटला फाइलिंगमार्फत माहिती देताना म्हटले आहे की, ‘दक्षिणेकडील चेन्नई विभागातील एमएएस-जीडीआर आणि एमएसबी-टीबीएम स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग विभागात एमएसडीएसी आणि उर्वरित एएफटीसी बदलण्यासाठी दक्षिण रेल्वेकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या कॉन्ट्रॅक्टची किंमत जवळपास १११ कोटी रुपये आहे. आरव्हीएनएल कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट १८ महिन्यांत पूर्ण करावा लागणार आहे.

आरव्हीएनएल’बाबत तज्ज्ञांचे मत

ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीशी संवाद साधताना स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी आरव्हीएनएल शेअरसंदर्भात महत्वाचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी म्हटले की, ‘गेल्या दोन ते तीन सत्रात आरव्हीएनएल शेअरमध्ये चांगली तेजी दिसून आली आहे आणि आरव्हीएनएल शेअर 455 रुपयांच्या आसपास मजबूत होताना दिसला होता. आरव्हीएनएल शेअर १५० दिवसांच्या मूव्हिंग सरासरीच्या वर टिकून असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुढेही आरव्हीएनएल शेअरमध्ये तेजी कायम राहील, असा तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे.

आरव्हीएनएल शेअर टार्गेट प्राईस

ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीशी संवाद साधताना स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी आरव्हीएनएल शेअरसाठी ५०० ते ५२० रुपयांचे टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच तज्ज्ञांनी आरव्हीएनएल शेअरवर 450 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्लाही दिला आहे.

आरव्हीएनएल शेअरने 2,298% परतावा दिला

मागील पाच या दिवसात आरव्हीएनएल शेअर 6.82% घसरला आहे. मागील एक महिन्यात आरव्हीएनएल शेअरने 8.25% परतावा दिला आहे. मागील सहा महिन्यात या शेअरने 20.84% परतावा दिला आहे. मागील एक वर्षात आरव्हीएनएल शेअरने 166.25% परतावा दिला आहे.

YTD आधारावर आरव्हीएनएल शेअरने 160.33% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 1,924.79% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये आरव्हीएनएल शेअरने गुंतवणूकदारांना 2,298.99% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price Thursday 12 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(154)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x