13 December 2024 7:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: RELIANCE

Reliance Share Price

Reliance Share Price | शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटची सुरुवात घसरणीसह झाली आहे. स्टॉक मार्केट सेन्सेक्स १६० अंकांनी घसरून ८१,१४९ वर ट्रेड करत होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी 30 अंकांनी घसरून 24,505 च्या पातळीवर पोहोचला होता. स्टॉक मार्केट निफ्टी बँक 62 अंकांनी घसरून 53,129 च्या पातळीवर पोहोचला होता. त्यानंतर त्यात १२० अंकांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीबाबत महत्वाची अपडेट आल्यानंतर शेअर फोकसमध्ये आला आहे. शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1.10 टक्के घसरून 1,248.95 रुपयांवर पोहोचला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा रशियाच्या सरकारी कंपनीसोबत करार

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने रशियाची सरकारी कंपनी रोसनेफ्टमधून वर्षाला १२ ते १३ अब्ज डॉलरचे कच्चे तेल आयात करण्यासाठी १० वर्षांचा करार केला आहे. रशियाची सरकारी तेल कंपनी रोसनेफ्ट रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीला दररोज पाच लाख बॅरल (वर्षाला २५ दशलक्ष टन) कच्च्या तेलाचा पुरवठा करणार आहे. सध्याच्या किमतीनुसार दहा वर्षांचा हा करार १२ ते १३ अब्ज डॉलरचा आहे.

वीजपुरवठ्याची हमी मिळणार

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रोसनेफ्ट कंपनीमधील या प्रकल्पामुळे दररोज ४ तास वीजपुरवठ्याची हमी मिळणार आहे. एसईसीआय रिलायन्स एनयू सनटेकसोबत २५ वर्षांसाठी वीज खरेदी करार (पीपीए) करेल आणि खरेदी केलेली सौर ऊर्जा भारतातील अनेक डिस्कॉमना विकली जाईल. रिलायन्स इंडस्ट्रीज एनयू सनटेक हा प्रकल्प बिल्ड-ओन-ऑपरेट तत्त्वावर विकसित करेल. कंपनी आयएसटीएस किंवा आयएनएसटीएसशी इंटरकनेक्शनसाठी केंद्रीय विद्युत नियामक आयोगाच्या नियमांचे पालन करून आंतरराज्यीय पारेषण प्रणालीशी जोडले जाईल.

रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 4,611% परतावा दिला

मागील ५ दिवसात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 4.74% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 0.25% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 14.76% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 2.63% परतावा दिला होता. मागील ५ वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 59.30% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने गुंतवणूकदारांना 4,611.24% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर हा शेअर 3.57% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price Friday 13 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Share price(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x