14 December 2024 4:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज

EPFO Passbook

EPFO Passbook | ईपीएफओने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी जाहीर केली आहे. आता कर्मचाऱ्यांना सेटलमेंटसाठी जास्त दगदग करण्याची गरज लागणार नाही. सेटलमेंट प्रक्रिया आणखीन सोपी झाल्यामुळे कर्मचारी वर्ग सुखावला आहे. ईपीएफओने बदललेल्या सेटलमेंट नियमांमुळे क्लेम करण्यासाठी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

आता ईपीएफओच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आधीपेक्षा जास्त प्रमाणात वित्तीय लाभ मिळण्याची शक्यता आहे. ईपीएफओचा हा नियम सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या 30 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये झाला आहे.

आता मिळणार सेटलमेंटपर्यंत व्याज :

ईपीएफओच्या पूर्वीच्या नियमांमध्ये कर्मचारी क्लेम करताना महिन्याच्या 24 तारखेला करत असेल तर, तो कलम 24 तारखेपर्यंतच सेटल असायचा. यामध्ये मागील महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतच कर्मचाऱ्याला व्याजाचे पैसे मिळायचे. परंतु नव्या नियमानुसार कर्मचारी सेटलमेंटच्या शेवटच्या तारखेपर्यंत व्याज मिळवू शकतो. क्लेम सेटलमेंटच्या शेवटच्या तारखेपर्यंत व्याज मिळाल्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला जास्त पैसे कमावता येणार आहेत.

कधी होणार नवे नियम लागू :

ईपीएफओने अजूनतरी नवे नियम लागू केले नाही आहेत. त्याचबरोबर सरकारकडून या नव्या नियमांबाबत कोणत्याही प्रकारचा खुलासा किंवा जाहीर बातमी देण्यात आली नाहीये. जोपर्यंत सरकार कोणत्याही प्रकारच्या नव्या नियमांची घोषणा करत नाही तोपर्यंत जुन्या नियमानुसार क्लेम सेटलमेंट केले जाईल.

1. माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार असं समजून आलं आहे की, बदललेल्या नियमानंतर ईपीएफओ कर्मचाऱ्यांना पूर्ण काळासाठी व्याज मिळणार आहे. जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त रिटर्न प्राप्त करण्यास मदत होईल.

2. क्लेम सेटलमेंटचे नवे नियम लागू झाल्यानंतर दीर्घकाळाचा कालावधी लागणार नाही. कर्मचाऱ्यांना क्लेम प्रोसेस केवळ एका महिन्याच्या आतमध्ये करता येणार आहे.

3. ईपीएफ ओकलेन सेटलमेंटमध्ये कोणताही कर्मचारी दाव्याने गोष्टी करू शकतो. याचे कारण म्हणजे तुम्हाला एक चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Passbook Saturday 14 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO Passbook(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x