15 December 2024 9:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER

Tata Power Share Price

Tata Power Share Price | शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी टाटा पॉवर शेअर 1.28 टक्के घसरून 428 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म टाटा पॉवर शेअरबाबत बुलिश आहे. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. टाटा पॉवरच्या शेअरसाठी मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने ‘ओव्हरवेट’ रेटिंग जाहीर केली आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)

मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म – टाटा पॉवर शेअर टार्गेट प्राईस

मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर शेअरसाठी ५८३ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 494.85 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 312.70 रुपये होता. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीच एकूण मार्केट कॅप सध्या 1,36,904 कोटी रुपये आहे.

टाटा पॉवर कंपनीचे मोठे प्लॅन

टाटा पॉवर लिमिटेड कंपनी राजस्थानमध्ये इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि रूफटॉप सोलर प्लांटसह विविध अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये 1.2 लाख कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार आहे. रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये कंपनीने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीच्या उपक्रमांमध्ये ७५,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे. टाटा पॉवर लिमिटेड कंपनी पुढे सांगितले की, २०३० पर्यंत आपली परिचालन क्षमता दुप्पट करून ३२ गिगावॅट करण्यासाठी टाटा पॉवर कंपनी सुमारे १.४६ लाख कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार आहे.

सप्टेंबर तिमाहीचे निकाल

दुसऱ्या तिमाहीत टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ८ टक्क्यांनी वाढून १,०९३.०८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे वाढत्या उत्पन्नामुळे टाटा पॉवर कंपनीच्या नफ्यात सकारात्मक वाढ झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत टाटा पॉवर कंपनीला 1,017.41 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. दुसऱ्या तिमाहीत टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 16,210.80 कोटी रुपये झाले आहे, जे गेल्या वर्षी 2023-24 च्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीत 16,029.54 कोटी रुपये इतके होतं.

टाटा पॉवर शेअरने 4,096 टक्के परतावा दिला

मागील ५ दिवसात हा शेअर 3.99% घसरला आहे आहे. मागील १ महिन्यात टाटा पॉवर शेअरने 5.76% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 5.25% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 28.45% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात टाटा पॉवर शेअरने 692.59% परतावा दिला आहे. टाटा पॉवर शेअरने लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना 4,096.08% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 29.58% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Power Share Price Saturday 14 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x