18 December 2024 3:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS SIP Calculator | 10 हजारांच्या SIP मधून कोटींची रक्कम जमा करण्यासाठी किती कालावधी लागेल, SIPचे संपूर्ण कॅल्क्युलेशन TTML Share Price | टाटा ग्रुपचा पेनी शेअर मालामाल करणार, तेजीने कमाई होणार, यापूर्वी 3430% परतावा दिला - NSE: TTML Suzlon Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार मल्टिबॅगर सुझलॉन शेअर, स्टॉक चार्टवर संकेत, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन सहित या 4 शेअर्ससाठी BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: MOTHERSON Horoscope Today | आज प्रॉपर्टी संबंधित कामे पूर्ण होतील तर, अनेकांच्या आयुष्यात नवीन संधी चालून येतील, पहा तुमचे राशिभविष्य Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
x

RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL

RVNL Share Price

RVNL Share Price | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. आरव्हीएनएल कंपनीने मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची माहिती दिली आहे. आरव्हीएनएल कंपनीने स्टॉक मार्केटला फाइलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, ‘आरव्हीएनएल कंपनीला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून 270 कोटी रुपयांचा मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे आरव्हीएनएल कंपनीला एका आठवडाभरात मिळालेला हा दुसरा मोठा कॉन्ट्रॅक्ट आहे. तत्पूर्वी आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण रेल्वेकडून 110.86 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

आरव्हीएनएल कंपनीला मिळालेल्या कॉन्ट्रॅक्टची डिटेल्स

रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला फाइलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, ‘आरव्हीएनएल कंपनीला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून लेटर ऑफ एक्सेप्टन्स प्राप्त झाले आहे. या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत नागपूर मेट्रो रेल प्रकल्प फेज 2 साठी रीच 3A मध्ये सात एलिवेटेड मेट्रो स्थानके बांधण्यात येणार आहेत. 3A मधील ही सात एलिवेटेड मेट्रो स्थानके म्हणजे हिंगणा माउंट व्ह्यू, राजीव नगर, वानाडोंगरी, APMC, रायपूर, हिंगणा बस स्थानक, हिंगणा अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच रीच 4A मधील तीन एलिवेटेड मेट्रो स्थानके, म्हणजे पारडी, कापसी खुर्द, ट्रान्सपोर्ट नगर ही स्थानके आहेत. या कॉन्ट्रॅक्टची एकूण किंमत 270 कोटी रुपये आहे. आरव्हीएनएल कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट 30 महिन्यांत पूर्ण करावा लागणार आहे.

आरव्हीएनएल कंपनीला याआधी कोणते कॉन्ट्रॅक्ट मिळाले

रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीला यापूर्वी 12 डिसेंबर रोजी दक्षिण रेल्वेकडून 1,10,86,49,140.99 रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. तर, 3 डिसेंबर रोजी पूर्व मध्य रेल्वेकडून 186,76,60,320.77 रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे.

आरव्हीएनएल शेअरने किती परतावा दिला

मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी आरव्हीएनएल शेअर 0.74 टक्के वाढून 473.40 रुपयांवर पोहोचला होता. जर आरव्हीएनएल शेअर्सच्या कामगिरीवर नजर टाकल्यास एका वर्षात गुंतवणूकदारांना 157 टक्के परतावा दिला. तर २०२४ मध्ये आतापर्यंत आरव्हीएनएल शेअरने 158 टक्के परतावा दिला आहे. मागील 2 वर्षात शेअरने 570 टक्के परतावा दिला आहे. तर मागील 3 वर्षात आरव्हीएनएल शेअरने 1258 टक्के परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price Tuesday 17 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(156)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x