18 December 2024 11:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन सहित या 4 शेअर्ससाठी BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: MOTHERSON Horoscope Today | आज प्रॉपर्टी संबंधित कामे पूर्ण होतील तर, अनेकांच्या आयुष्यात नवीन संधी चालून येतील, पहा तुमचे राशिभविष्य Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; सरकारी कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, दरमहा 1,80.000 रुपये पगार मिळेल Piccadily Agro Share Price | दारू कंगाल करते, पण हा दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करेल, 1 लाखावर 40 काेटी परतावा - BOM: 530305 NHPC Share Price | एनएचपीसी शेअर मल्टिबॅगर परतावा देणार, CLSA ब्रोकरेजने दिले संकेत, टार्गेट नोट करा - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
x

Wipro Share Price | विप्रो कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: WIPRO

Wipro Share Price

Wipro Share Price | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मंगळवारी एफआयआय कडून जोरदार विक्री झाल्याने त्याचे परिणाम स्टॉक मार्केटवर झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र काही शेअर्सबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत. विप्रो कंपनीबाबत मोठी अपडेट आल्याने ब्रोकरेज फर्मने सुद्धा तेजीचे संकेत दिले आहेत. मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी विप्रो शेअर 0.32 टक्के घसरून 308.20 रुपयांवर पोहोचला होता. (विप्रो लिमिटेड कंपनी अंश)

सीएलएसए ब्रोकरेजने दिले तेजीचे संकेत

सीएलएसए ब्रोकरेज फर्मने विप्रो लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने विप्रो लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे सीएलएसए ब्रोकरेज फर्मने विप्रो शेअरची टार्गेट प्राईस ३०३ रुपयांवरून आता ६०६ रुपये केली आहे. म्हणजे विप्रो शेअर गुंतवणूकदारांना ९६ टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो.

विप्रो कंपनी अधिग्रहण करणार

विप्रो लिमिटेड कंपनीने अप्लाइड व्हॅल्यू टेक्नॉलॉजीज कंपनीच्या अधिग्रहणासाठी करार केला आहे. हा करार ३४० कोटी रुपयांचा आहे अशी माहिती देण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत हा करार पूर्ण होईल अशी माहिती आहे.

विप्रो लिमिटेड कंपनी एका मोठ्या कंपनीच्या अधिग्रहणाच्या मार्गावर आहे अशी माहिती कंपनीने दिली. या वर्षाच्या सुरुवातीला विप्रो लिमिटेड कंपनीने जनरल मोटर्स आणि मॅग्ना सह ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर मार्केटप्लेस प्लॅटफॉर्म एसडीव्हर्समधील 27% हिस्सा 5.85 दशलक्ष डॉलरमध्ये खरेदी केला होता. त्यानंतर विप्रो लिमिटेड कंपनीने अमेरिकेतील इन्सुरटेक कंपनी एग्ने ग्लोबलचे 66 दशलक्ष डॉलर्समध्ये 60 टक्के अधिग्रहण केले होते.

विप्रो शेअरने 4367% परतावा दिला

मागील ५ दिवसात विप्रो लिमिटेड शेअरने 0.42% परतावा दिला. मागील १ महिन्यात या शेअरने 11.51% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात विप्रो लिमिटेड शेअरने 25.34% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात शेअरने 38.46% परतावा दिला. मागील ५ वर्षात विप्रो लिमिटेड शेअरने 144.84% परतावा दिला. तसेच लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 4,367.39% परतावा दिला आहे. YTD आधारावर विप्रो लिमिटेड शेअरने 29.20% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Wipro Share Price Tuesday 17 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Wipro Share Price(31)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x