18 December 2024 12:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा पेनी शेअर मालामाल करणार, तेजीने कमाई होणार, यापूर्वी 3430% परतावा दिला - NSE: TTML Suzlon Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार मल्टिबॅगर सुझलॉन शेअर, स्टॉक चार्टवर संकेत, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन सहित या 4 शेअर्ससाठी BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: MOTHERSON Horoscope Today | आज प्रॉपर्टी संबंधित कामे पूर्ण होतील तर, अनेकांच्या आयुष्यात नवीन संधी चालून येतील, पहा तुमचे राशिभविष्य Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; सरकारी कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, दरमहा 1,80.000 रुपये पगार मिळेल Piccadily Agro Share Price | दारू कंगाल करते, पण हा दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करेल, 1 लाखावर 40 काेटी परतावा - BOM: 530305
x

Free Aadhaar Update | मोफत आधार अपडेटची तारीख, अन्यथा पुढील 1 वर्ष वाट पाहावी लागेल, जाणून घ्या तारीख

Free Aadhaar Update

Free Aadhaar Update | UIDAI म्हणजेच आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने डेटाबेसमध्ये डॉक्युमेंट अपडेट करण्याची तारीख आणखीन पुढे ढकलली आहे. आधार कार्ड हे आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलेले व्यक्ती फ्री आधार अपडेट तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत. माध्यमांकडून मिळालेला माहितीनुसार मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पुढच्या वर्षाच्या कोणत्या महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे जाणून घ्या.

मोफत आधार अपडेटची तारीख :

ज्या व्यक्तींना आपले डॉक्युमेंट्स लवकरात लवकर अपडेट करून घ्यायचे आहेत त्यांना 2025 या नव्या वर्षातील जून महिन्याच्या 14 तारखेला आधार कार्ड किंवा त्यासंबंधीत कागदपत्र अपडेट करून मिळू शकतात. मोफत आधार कार्ड अपडेटची तारीख आधारने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केली आहे.

कोणत्या व्यक्तींसाठी महत्त्वाची बातमी :

ही बातमी त्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाची आहे ज्यांनी 10 वर्षांपूर्वी स्वतःचं आधार कार्ड काढून घेतलं आहे. आधार कार्ड अपडेट करणे कंपल्सरी जरी नसले तरीसुद्धा तुम्हाला मोफत आधार कार्ड अपडेट करून मिळणार आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींना एकही पैसा न खर्च करता स्वतःचा आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावे. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने देखील आधार कार्ड अपडेट करून घेऊ शकता.

1. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला myaadhar.uidai.gov.in या वेबसाईटवर जा.

2. लॉगिन व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला कॅपच्या कोडने लॉगिन करावे लागेल. त्यासाठी तुमचे आधार कार्ड तुमच्या मोबाईलला लिंक असणे महत्वाचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर लॉगिन नावाचं ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

3. पुढील प्रोसेसमध्ये तुम्हाला लॉग इन विथ ओटीपी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर लगेचच तुमच्या नंबरवर एक ओटीपी पाठवण्यात येईल. हा ओटीपी केवळ 10 मिनिटांसाठी व्हॅलिड असणार आहे.

4. त्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होईल ज्यामध्ये मोफत आधार कार्ड अपडेटसाठी संपूर्ण डॉक्युमेंटसाठी माहिती विचारण्यात येईल. ती संपूर्ण प्रोसेस पूर्ण करून घ्या.

5. स्क्रीनवर दिलेल्या गाईडलाईनुसार तुम्हाला संपूर्ण प्रोफेस फॉलो करून घ्यायची आहे.

6. तुम्ही दिलेल्या योग्य कागदपत्रांची सरकारकडून कधीही पाहणी होऊ शकते अशा पद्धतीची हमी तुमच्याकडून विचारात घेण्यात येते.

7. शेवटच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला Acknowledgement Slip देण्यात येईल. तुम्हाला आधार कार्ड अपडेटची संबंधित स्टेटस चेक करायचा असेल तर तुम्ही ही फाईल डाऊनलोड किंवा सेव्ह करून ठेवा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Free Aadhaar Update Tuesday 17 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Free Aadhaar Update(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x