18 December 2024 4:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | केवळ 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीतून 'या' व्यवसायाची सुरुवात करा, लाखोंच्या घरात पैसे कमवाल Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RELIANCE Quant Mutual Fund | पगारदारांनो, श्रीमंत करणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांची यादी सेव्ह करा, पैशाचा पाऊस पडेल Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS SIP Calculator | 10 हजारांच्या SIP मधून कोटींची रक्कम जमा करण्यासाठी किती कालावधी लागेल, SIPचे संपूर्ण कॅल्क्युलेशन
x

Suzlon Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार मल्टिबॅगर सुझलॉन शेअर, स्टॉक चार्टवर संकेत, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | स्टॉक मार्केटमधील सर्वाधिक चर्चेत असलेला सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. सुझलॉन शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास 3,591टक्के परतावा दिला आहे. मात्र आजही १०० रुपयांपेक्षा सुद्धा कमी किंमतीचा शेअर पुढेही मालामाल करू शकतो. ११ जानेवारी २००८ रोजी सुझलॉन शेअर ३९० रुपयांवर ट्रेड करत होता. मात्र आता सुझलॉन शेअर 68.04 रुपयांवर ट्रेड करतोय. मागील महिन्याभरात सुझलॉन शेअरने 14.82 टक्के परतावा दिला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी शेअर 2.19 टक्के घसरून 68.04 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. तसेच या शेअरबाबत गुंतवणूकदारांनी कोणत्या रणनीतीचा अवलंब करावा हे देखील स्पष्ट केलं आहे.

सुझलॉन एनर्जी शेअर टार्गेट प्राईस

स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते सुझलॉन एनर्जी शेअरचा चार्ट स्ट्रक्चर मजबूत दिसत आहे. सप्टेंबरमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर ८६ ते ८७ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर ट्रेड करत होता. मात्र यानंतर सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये करेक्शन पाहायला मिळाली होती. अलीकडेच सुझलॉन एनर्जी शेअर ५३ रुपयांपर्यंत घसरून त्यानंतर सातत्याने तेजी कायम ठेवली आहे. सध्या हा शेअर ७० रुपयांची पातळी ओलांडण्यासाठी तयार होत आहे.

सुझलॉन शेअर 100 रुपयांच्या टार्गेट प्राईसवर दिसू शकतो

सुझलॉन एनर्जी शेअरने ७० रुपयांची पातळी ओलांडली तर पुढे हा शेअर ८६ रुपयांपर्यंत वाढू शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. अशा वेळी सुझलॉन शेअर्सबाबत डिप्सवर खरेदीची रणनीती ठेवावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. मात्र शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करणाऱ्यांनी 59 रुपयांच्या पातळीवर स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला देखील दिला आहे. पुढी सहा महिन्यांत सुझलॉन शेअर 86-87 रुपयांची पातळी ओलांडू शकतो. जर सुझलॉन एनर्जी शेअरने ही पातळी ओलांडली तर 1 वर्षात 100 रुपयांच्या टार्गेट प्राईसवर दिसू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

सुझलॉन शेअरने 3,597 टक्के परतावा दिला

मागील ५ दिवसात या शेअरने 2.47% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात सुझलॉन एनर्जी शेअरने 14.82% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 36.19% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात सुझलॉन एनर्जी शेअरने 79.76% परतावा दिला आहे. YTD आधारावर शेअरने 76.73% परतावा दिला आहे. तसेच मागील ५ वर्षात सुझलॉन एनर्जी शेअरने 3,597.83% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Wednesday 18 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(273)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x