18 December 2024 9:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | एनएचपीसी सहित 'हे' 5 शेअर्स मालामाल करणार, किती परतावा मिळेल तपासून घ्या - NSE: NHPC Post Office Scheme | पोस्टाची 'ही' योजना ठरली सुपरहिट; फक्त व्याजाने झाली लाखोंची कमाई, जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती Home Loan | घर खरेदी करताय, 75 लाखांच्या होम लोनवर नेमकी कोणती बँक कमीत कमी व्याजदर देईल पहा, फायदा होईल Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने धावणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: IRFC Business Idea | केवळ 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीतून 'या' व्यवसायाची सुरुवात करा, लाखोंच्या घरात पैसे कमवाल
x

Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही

Property Knowledge

Property Knowledge | अजूनही बहुतांश व्यक्तींना मालमत्तेशी संबंधित काही गोष्टींची पुरेपूर माहिती नसते. माहिती नसल्यामुळे काही व्यक्तींच्या हातून फार मोठ्या चुका होतात. या चुका तुमच्यावर पश्चातापाची वेळ आणून ठेवतात. अशावेळी मालमत्ता कायद्यासंबंधीत गोष्टींची माहिती प्रत्येक व्यक्तीकडे असणे अत्यंत गरजेचे आहे.

मालमत्तेची निगडित आणखीन एक मुद्दा म्हणजे वडीलोपार्जित संपत्तीवर अधिकार. या मुद्द्यामध्ये तुम्ही तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीवर किती वर्षांमध्ये दावा करू शकणार आहात हे तुम्हाला ठाऊक आहे का. कारण की वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क सांगण्यासाठी, दावा ठोकण्यासाठी एक विशिष्ट वेळ दिला गेला आहे.

दावा करण्याचा कालावधी :

मालमत्ता संबंधित विषयातील वडीलोपार्जित संपत्तीच्या मुद्द्यावर बोलायचे झाले तर, तुम्ही तुमच्या वडिलांच्या मालमत्तेवर अवघ 12 वर्षांमध्ये दावा करू शकता. तुम्हाला मालमत्तेतून वगळले गेले आहे किंवा अशाप्रकारेचे कृत्य कृत्य तुम्हाला आढळून आले तर तुम्ही लगेचच न्यायालयात धाव घेऊन 12 वर्षांच्या आत दावा ठोकून न्याय मागू शकता.

दिलेल्या कालावधीत व्यक्तीने वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क सांगितला नाही तर, मालमत्ता कायद्यांच्या नियमानुसार त्या व्यक्तीला प्रॉपर्टी मध्ये जागा नाही किंवा त्याचा वडिलांच्या संपत्तीवर कोणत्याही प्रकारचा हक्क नाही.

वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे नेमकं काय :

तुमचे पणजोबा, आजोबा किंवा तुमच्या वडिलांकडून मिळालेल्या संपत्तीला वडिलोपार्जित मालमत्ता असे म्हणतात. वडिलोपार्जित मालमत्ता केवळ तोपर्यंतच राहील जोपर्यंत मालमत्तेत विभागणी केली जाणार नाही. एकदा का मालमत्तेची विभागणी झाली तर, ती संपत्ती वडिलोपार्जित नसेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Property Knowledge Wednesday 18 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Property Knowledge(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x