18 December 2024 11:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPPB Recruitment | इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ऑफिसर पदासाठी भरती जाहीर; कुठे अन् कसा कराल अर्ज जाणून घ्या सविस्तर Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 4 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मजबूत परतावा मिळणार - NSE: TATATECH NHPC Share Price | एनएचपीसी सहित 'हे' 5 शेअर्स मालामाल करणार, किती परतावा मिळेल तपासून घ्या - NSE: NHPC Post Office Scheme | पोस्टाची 'ही' योजना ठरली सुपरहिट; फक्त व्याजाने झाली लाखोंची कमाई, जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती Home Loan | घर खरेदी करताय, 75 लाखांच्या होम लोनवर नेमकी कोणती बँक कमीत कमी व्याजदर देईल पहा, फायदा होईल Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IDEA
x

IRFC Share Price | IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने धावणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: IRFC

IRFC Share Price

IRFC Share Price | बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी ५० हे दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले होते. दरम्यान, ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीशी बोलताना स्टॉक मार्केट तज्ज्ञ गौरांग शहा यांनी आयआरएफसी शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. तसेच आयआरएफसी शेअर्ससंबंधित रणनीती सुद्धा सांगितली आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)

आयआरएफसी शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला

स्टॉक मार्केट तज्ज्ञ गौरांग शहा आठवण करून देताना म्हणाले की, ‘काही वर्षांपूर्वी जेव्हा आयआरएफसी कंपनीचा आयपीओ आला तेव्हा त्याबाबत एक रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या रिपोर्टनुसार, जेव्हा रेल्वे, डिफेन्स किंवा कॅपिटल गुड इंजिनीअरिंग क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात तेव्हा ती केवळ सहा महिने किंवा वर्षभराच्या व्हिजनने करू नये. अशा शेअर्समधील गुंतवणुकीचा कालावधीत किमान दीड ते दोन वर्षे किंवा अडीच वर्षाचा असावा. तेव्हाच गुंतवणूकदारांना निर्णायक नफा मिळू शकतो असं गौरांग शहा म्हणाले.

गौरांग शहा पुढे म्हणाले की, सध्या भारतीय रेल्वे संपूर्ण कायापालट होण्याच्या टप्प्यात आहे. त्यामुळे सर्व सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांची पुढील 3-4 किंवा 5 वर्षांसाठी अनेक कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतात. इतकंच नाही तर त्या कॉन्ट्रॅक्टची अंमलबजावणी सुरु असताना त्यांचे सकारात्मक परिणामही दिसू शकतात. तज्ज्ञांनी सांगितले की, आयआरएफसी शेअर्सवर सध्या कोणतेही कव्हरेज नाही, मात्र गुंतवणूकदारांनी आयआरएफसी शेअर्सबाबत लॉन्ग टर्म दृष्टिकोन ठेवावा असा सल्ला दिला आहे.

आयआरएफसी शेअर सध्याची स्थिती

बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी आयआरएफसी शेअर 2.15 टक्के घसरून 153.29 रुपयांवर पोहोचला होता. आयआरएफसी कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 229 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 87.10 रुपये होता. आयआरएफसी कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 2,00,290 कोटी रुपये आहे.

आयआरएफसी शेअरने 518 टक्के परतावा दिला

मागील ५ दिवसात आयआरएफसी शेअर 7.32% घसरला आहे. मागील १ महिन्यात आयआरएफसी शेअरने 10.85% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 12.76% घसरला आहे. मागील १ वर्षात आयआरएफसी शेअरने 62.47% परतावा दिला आहे. YTD आधारावर शेअरने 52.68% परतावा दिला आहे. तसेच मागील ५ वर्षात आयआरएफसी शेअरने 518.10% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price Wednesday 18 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(111)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x