19 December 2024 1:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPPB Recruitment | इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ऑफिसर पदासाठी भरती जाहीर; कुठे अन् कसा कराल अर्ज जाणून घ्या सविस्तर Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 4 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मजबूत परतावा मिळणार - NSE: TATATECH NHPC Share Price | एनएचपीसी सहित 'हे' 5 शेअर्स मालामाल करणार, किती परतावा मिळेल तपासून घ्या - NSE: NHPC Post Office Scheme | पोस्टाची 'ही' योजना ठरली सुपरहिट; फक्त व्याजाने झाली लाखोंची कमाई, जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती Home Loan | घर खरेदी करताय, 75 लाखांच्या होम लोनवर नेमकी कोणती बँक कमीत कमी व्याजदर देईल पहा, फायदा होईल Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IDEA
x

Post Office Scheme | पोस्टाची 'ही' योजना ठरली सुपरहिट; फक्त व्याजाने झाली लाखोंची कमाई, जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती

Post Office Scheme

Post Office Scheme | जबरदस्त परतावा देण्यासाठी पोस्टाच्या कमी कालावधीच्या योजना प्रचंड लोकप्रिय आहेत. आतापर्यंत पोस्टाच्या योजनांनी गुंतवणूकदारांना शंभर टक्के सुरक्षिततेची हमी आणि बंपर परतावा मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

पोस्टाच्या सर्वच योजना या सरकारी योजना असल्यामुळे तुम्हाला परताव्याची देखील शंभर टक्के गॅरंटी दिली जाते. पोस्ट अंतर्गत अशाही योजना राबविल्या जातात ज्या लहान मुलांसाठी, आर्थिक दृष्टीने दुर्बळ असलेल्या महिलांसाठी त्याचबरोबर ज्येष्ठांच्या सुख सोयीकरिता देखील अनेक चांगल्या व्याजदराच्या योजना उपलब्ध आहेत. यामधीलच एक अल्पकालावधी असलेली पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना.

मिळतो दुप्पट परतावा :

नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या कमाईमधील एक हिस्सा बचतीसाठी बाजूला काढतो. सध्या ट्रेडिंग, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे बऱ्याच व्यक्तींचा कल दीर्घकालीन बचतीकडे आहे. यामध्ये तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीचे माध्यम शोधत असाल तर पोस्टाची टाईम डिपॉझिट म्हणजेच टीडी ही योजना तुमच्यासाठी अत्यंत फायद्याची ठरू शकणार आहे. पोस्टाची टीडी सध्या प्रचंड लोकप्रिय ठरत आहे कारण की सध्याच्या घडीला पोस्टाची टीडी गुंतवणूकदाराला 7.5% व्याजदराचा लाभ देत आहे.

टीडीचा कालावधी जाणून घ्या :

1. पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना ही गुंतवणूकदारांसाठी फ्लेक्झिबल टाईम देते.

2. म्हणजेच पोस्टाच्या योजनेचे तुम्ही पाच वर्षा, तीन वर्षांसाठी, दोन वर्षांसाठी आणि एका वर्षासाठी देखील गुंतवणूक करून व्याजदराचा लाभ मिळवू शकता.

3. यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीच्या कालावधीनुसार व्याजदर प्रदान केले जाते. यामध्ये एका वर्षासाठी 6.9%, तीन वर्षांसाठी 7% आणि पाच वर्षांसाठी 7.5% व्याजदर दिले जात आहे. तुम्हाला तुमचे पैसे दुप्पटी वाढवायचे असतील तर, 5 वर्षांपेक्षा अधिक काळ देखील लागू शकतो.

4. पोस्टाचे टाईम डिपॉझिट योजना कर सवलतीचा लाभ देखील प्रदान करते. आयकर विभाग कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत तुम्ही कर सवलतीचा लाभ उचलू शकता. त्याचबरोबर योजनेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही यामध्ये सिंगलच नाही तर जॉईंट खाते देखील उघडू शकता.

केवळ व्याजाने कमवा 2 लाखांपेक्षा अधिक रक्कम :

तुम्हाला पोस्टाच्या टीडी योजनेचा लाभ पैसे दुप्पट करण्यासाठी घ्यायचा असेल तर, एक उदाहरण समजून घ्या. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने पोस्टाच्या टीडीमध्ये एकूण पाच वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवले आणि 5 वर्षांच्या कालावधीनुसार 7.5% व्याजदर मिळत असेल तर, मॅच्युरिटीपर्यंत ही रक्कम 7,24,974 रुपये होतात. म्हणजेच तुम्हाला व्याजाचे एकूण 2,24,974 रुपये मिळतात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme Wednesday 18 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(202)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x