19 December 2024 5:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सह हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 40 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | पेनी शेअरबाबत ब्रोकरेज फर्मचे मोठे संकेत, स्टॉक तेजीत येणार की कोसळणार - NSE: IDEA Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या Post Office Saving | बँकांपेक्षा पोस्टात सेविंग अकाउंट उघडण्याचे जबरदस्त फायदे ठाऊक आहेत का, इथे घ्या योग्य माहिती RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मोठी कमाई होईल, आयपीओ डिटेल्स नोट करा - GMP IPO HAL Share Price | डिफेन्स HAL कंपनी शेअरसहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 60 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
x

IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मोठी कमाई होईल, आयपीओ डिटेल्स नोट करा - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड कंपनी आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड कंपनी या आयपीओ’मार्फत ८३८.९१ कोटी रुपये उभारणार आहे.

ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड कंपनीबद्दल

ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड ही एक अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड कंपनीने २०० हून अधिक वीज पारेषण आणि वितरण प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड कंपनी केनिया, टांझानिया, बांगलादेश, नायजर, नायजेरिया, माली, कॅमेरून, फिनलंड, पोलंड आणि निकाराग्वा सह 58 देशांमध्ये सेवा पुरवते.

ट्रान्सरेल लाइटिंग कंपनी आयपीओ प्राईस बँड

ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी 410-432 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे. रिटेल गुंतवणूकदारांना ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड कंपनी आयपीओच्या एका लॉटमध्ये 34 शेअर्स मिळतील. म्हणजे रिटेल गुंतवणूकदारांना किमान १४,६८८ रुपये गुंतवावे लागतील.

आयपीओ निधी कुठे खर्च करणार

ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड कंपनी आयपीओ’मार्फत मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनीच्या कार्यशील भांडवलाच्या गरजा, कंपनीच्या भांडवली खर्चाला वित्तपुरवठा करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी खर्च करणार आहे.

ट्रान्सरेल लाइटिंग आयपीओ शेअर अलॉटमेंट

ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड कंपनी आयपीओ १९ डिसेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. ट्रान्सरेल लाइटिंग आयपीओ शेअरचे अलॉटमेंट २६ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. तसेच ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स २७ डिसेंबरला बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध होणार आहेत.

ट्रान्सरेल लाइटिंग आयपीओ जीएमपी

अनलिस्टेड मार्केटमधील अपडेटनुसार, ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड कंपनी आयपीओसाठी ग्रे-मार्केट प्रीमियम 19 डिसेंबर 2024 पर्यंत 145 रुपये होता. या जीएमपीच्या आधारे, ट्रान्सरेल लाइटिंग शेअर्सची अंदाजित लिस्टिंग किंमत 577 रुपये आहे, जी वरच्या प्राईस बँड पेक्षा 33.56% परतावा मिळण्याचे संकेत देत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Transrail Lighting Ltd Thursday 19 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(158)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x