21 December 2024 5:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, मग ही फंडाची स्कीम पैशाचा पाऊस पाडेल, यापूर्वी 4346% परतावा दिला SBI Mutual Fund | बिनधास्त पैसे गुंतवा या SBI फंडाच्या योजनेत, पैसा अनेक पटीने वाढेल, सेव्ह करून ठेवा स्कीम डिटेल्स 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट IRFC Share Price | IRFC शेअर पुन्हा फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: IRFC Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा शेअर, गुंतवणूकदारांना 4000 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला - NSE: MUFIN Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी माझगाव डॉक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, फायद्याची अपडेट- NSE: MAZDOC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

CIBIL Score | पगारदारांनो, आता तुमचा क्रेडिट डेटा प्रत्येक 2 हफ्त्यांनी अपडेट होणार, सिबिल स्कोरवर काय परिणाम होणार जाणून घ्या

CIBIL Score

CIBIL Score | भारतीय रिझर्व बँकेने आणि एनबीएफसी क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्याने CICs ला क्रेडिट रिपोर्टिंगमध्ये एक महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यामध्ये बँकांना त्याचबरोबर एमबीएफसीला प्रत्येक महिन्याला नाही तर, चक्क 2 हप्त्यांनी स्वतःचा क्रेडिट डेटा अपडेट करून घ्यावा लागेल. हा नवीन नियम आता नाही तर 2025 च्या 1 जानेवारी या तारखेपासून लागू होणार आहे.

क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्टिंगमध्ये मोठा बदल :

याआधी बँकांना त्याचबरोबर एनबीएफसीला मासिक आधारावरच क्रेडिट हिस्ट्री प्रदान करावी लागायची. परंतु आता तसं नसणार. तुम्हाला प्रत्येक 2 हप्त्यांनंतर क्रेडिट हिस्ट दाखवावी लागेल. म्हणजेच क्रेडिट डेटा तुम्हाला प्रत्येक 15 दिवसानंतर अपडेट करून घ्यावा लागेल. ही सुविधा ग्राहकांच्या क्रेडिट हिस्ट्रीला जलद गतीने अपडेट करण्यासाठी बनवली गेली. या गोष्टीचा क्रेडिट स्कोरवर चांगला परिणाम होणार आहे.

सिबिल स्कोरवर काय होईल परिणाम :

सिबिल स्कोर म्हणजे 3 अंकी क्रमांक असलेला नंबर असतो. यामध्ये उधारकर्त्याची क्रेडिट क्षमता दिसून येते. म्हणजेच जो व्यक्ती क्रेडिट कार्डमार्फत कोणत्याही प्रकारचे ईएमआय किंवा पेमेंट करण्यास उशीर करत असेल तर, जलद गतीने होणाऱ्या प्रक्रियेमधून ही गोष्ट लवकरात लवकर समोर येईल. असं झाल्यानंतर आपोआपच क्रेडिट स्कोरवर नकारात्मक परिणाम होताना पाहायला मिळेल.

कोणाला होणार जास्त लाभ :

या नव्या सुविधेचा लाभ ग्राहकांसह वित्तीय संस्थानांना देखील होणार आहे. जलद गतीने समजणाऱ्या या सुविधेमुळे उधारकर्त्याच्या क्रेडिट स्कोरवर जास्त परिणाम झालेला पाहायला मिळणार नाही. तो कायम सतर्क राहून बिले आणि पेमेंट करेल.

त्याचबरोबर वित्तीय संस्थांना देखील भरपूर मदत होणार आहे. कारण की जलद गतीने मिळणाऱ्या माहितीमुळे त्यांना मूल्यांकन करण्यास सोपे जाणार आहे. यामध्ये त्यांना पटापट डाटा जमा करता येईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | CIBIL Score Friday 20 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#CIBIL Score(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x