21 December 2024 1:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, मग ही फंडाची स्कीम पैशाचा पाऊस पाडेल, यापूर्वी 4346% परतावा दिला SBI Mutual Fund | बिनधास्त पैसे गुंतवा या SBI फंडाच्या योजनेत, पैसा अनेक पटीने वाढेल, सेव्ह करून ठेवा स्कीम डिटेल्स 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट IRFC Share Price | IRFC शेअर पुन्हा फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: IRFC Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा शेअर, गुंतवणूकदारांना 4000 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला - NSE: MUFIN Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी माझगाव डॉक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, फायद्याची अपडेट- NSE: MAZDOC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर कमाई होईल, IPO डीटेल्ड नोट करा - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | सेनोरेस फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनी आयपीओ २० डिसेंबर २०२४ पासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या आयपीओ’मार्फत सेनोरेस फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनी ५८२.११ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. या आयपीओ’मार्फत कंपनी १.२९ कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करणार आहे. तसेच ऑफर फॉर सेल अंतर्गत सेनोरेस फार्मास्युटिकल्स कंपनीकडून २१ लाख शेअर्स जारी केले जातील. हा आयपीओ गुंतवणुकीसाठी २४ डिसेंबरपर्यंत खुला असेल.

आयपीओ शेअर प्राईस बँड

सेनोरेस फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनी आयपीओसाठी 372 ते 391 रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. सेनोरेस फार्मास्युटिकल्स आयपीओच्या एका लॉटमध्ये गुंतवणूकदारांना ३८ शेअर्स मिळतील. म्हणजे रिटेल गुंतवणूकदारांना किमान १४,८५८ रुपये पैसे गुंतवावे लागणार आहेत.

सेनोरेस फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ७५ टक्के, रिटेल गुंतवणूकदारांसाठी १० टक्के आणि बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १५ टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. या आयपीओ मार्फत अँकर गुंतवणूकदारांकडून २६०.६३ कोटी रुपये गोळा करण्यात सेनोरेस फार्मास्युटिकल्स कंपनीला यश आले आहे.

ग्रे-मार्केट प्रीमियम

इन्व्हेस्टर्स गेन्स डॉटकॉमच्या रिपोर्टनुसार, शुक्रवारी सेनोरेस फार्मास्युटिकल्स कंपनीचा आयपीओ शेअर ग्रे-मार्केटमध्ये १५० रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत होता. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे संकेत आताच मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून सेनोरेस फार्मास्युटिकल्सच्या जीएमपीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

सेनोरेस फार्मास्युटिकल्स कंपनीबद्दल

सेनोरेस फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही एक फार्मा क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी आहे. सेनोरेस फार्मास्युटिकल्स कंपनी विविध प्रकारच्या औषधांची निर्मिती करते. सेनोरेस फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीचा व्यापार अमेरिका, कॅनडा, ब्रिटन सारख्या मोठ्या देशांमध्ये सुद्धा पसरलेला आहे. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत सेनोरेस फार्मास्युटिकल्स कंपनीकडे एकूण 55 उत्पादने आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Senores Pharmaceuticals Ltd Friday 20 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(159)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x