9 January 2025 4:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर 60 रुपयांच्या खाली घसरला, मल्टिबॅगर शेअर अजून किती घसरणार - NSE: SUZLON IREDA Share Price | शेअर प्राईस 32 रुपयांवरून 214 रुपयांवर पोहोचली, आता शेअर पुन्हा फोकसमध्ये आला - NSE: IREDA EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH Quant Mutual Fund | जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, SIP वर मिळेल 49 लाख 16,920 रुपये परतावा Penny Stocks | 2 रुपये 30 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, फायदा घ्या, फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील - Penny Stocks 2025 BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर्स मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: BEL
x

Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी माझगाव डॉक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, फायद्याची अपडेट- NSE: MAZDOC

Mazagon Dock Share Price

Mazagon Dock Share Price | शुक्रवारचा दिवस स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांसाठी नकारात्मक ठरला होता. शुक्रवारच्या सत्रात दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले होते. शुक्रवारी पहिल्या अर्ध्या तासात स्टॉक मार्केटमध्ये मोठी सुधारणा दिसून आली होती.मात्र त्यानंतर मोठी घसरण सुरूच राहिली होती. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी ३ शेअर्स सुचवले आहेत. तसेच तज्ज्ञांनी या ३ शेअर्सची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.

Cyient DLM Share Price – NSE: CYIENTDLM

स्टॉक मार्केट तज्ज्ञ विकास सेठी यांनी सायंट डीएलएम लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. विकास सेठी यांनी सायंट डीएलएम लिमिटेड कंपनी शेअरसाठी ७१० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच तज्ज्ञांनी सायंट डीएलएम कंपनी शेअरसाठी ६६० रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. सायंट डीएलएम लिमिटेड कंपनी प्रामुख्याने एरोस्पेस, वैद्यकीय तसेच संरक्षण क्षेत्रासाठी मुद्रित सर्किट बोर्ड आणि इतर इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट तयार करते. सायंट डीएलएम लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक सुद्धा मजबूत आहे.

TD Power Share Price – NSE: TDPOWERSYS

स्टॉक मार्केट तज्ज्ञ विकास सेठी यांनी टीडी पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. विकास सेठी यांनी टीडी पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी ४७५ रुपये ही शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ४३५ रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.

टीडी पॉवर लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक देखील मजबूत आहे. यामध्ये रेल्वे, तेल आणि वायू क्षेत्रातील बड्या कंपन्यांकडून मिळालेल्या कॉन्ट्रॅक्टचा देखील समावेश आहे. टीडी पॉवर लिमिटेड कंपनीने नुकताच कर्नाटक राज्यात नवीन प्रकल्प उभारला आहे. टीडी पॉवर लिमिटेड ही कर्जमुक्त कंपनी असून फंडामेंटल देखील मजबूत आहे असं स्टॉक मार्केट तज्ज्ञ विकास सेठी यांनी म्हटलं आहे.

Mazagon Dock Share Price – NSE: MAZDOCK

रेलिगेअर ब्रोकिंग फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ अजित मिश्रा यांनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ अजित मिश्रा यांनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनी शेअरसाठी ५,५३० ते ५,८०० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच तज्ज्ञांनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स शेअरसाठी 4,750 रुपये स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. सध्या हा शेअर 4,724.25 रुपयांवर ट्रेड करतोय.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mazagon Dock Share Price Friday 20 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Mazagon Dock Share Price(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x