25 December 2024 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO Watch | आला रे आला 13 रुपयांचा स्वस्त IPO आला, झटपट मल्टिबॅगर कमाई होईल, संधी सोडू नका - IPO GMP Penny Stocks | 3 रुपयाच्या पेनी शेअरने 1 वर्षात गरिबांना करोडपती केलं, सतत पैशाचा पाऊस पाडणारा शेअर - Penny Stocks 2024 SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना
x

BEL Vs HAL Share Price | 4 डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL

BEL Vs HAL Share Price

BEL Vs HAL Share Price | मागील ५ दिवस शेअर बाजारात सलग मोठी घसरण झाल्यानंतर सोमवारी तेजी पाहायला मिळाली होती. दरम्यान, एनएसई निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक अजूनही अस्थिर असल्याचं पाहायला मिळतंय. परंतु डिफेन्स क्षेत्रातील शेअर्स पुढे मजबूत कमाई करून देऊ शकतात. डिफेन्स कंपनी शेअर्सची गुंतवणूकदार अजूनही मोठी खरेदी करत आहेत.

दरम्यान, एलारा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स, एचएएल, भारत डायनॅमिक्स, डेटा पॅटर्न कंपनीच्या शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. एलारा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने या डिफेन्स कंपनी शेअर्ससाठी टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.

Bharat Electronics Share Price – NSE: BEL

एलारा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. नुकताच २७० रुपयांचा नीचांकी स्तर लावल्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर पुन्हा वधारला आहे. मंगळवारी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शेअर 295 रुपयांवर ट्रेड करत होता. एलारा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरसाठी ३४५ रुपये टार्गेट प्राइससह ‘बाय’ कॉल दिला आहे. तसेच फिलिप कॅपिटल ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ३९० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Hindustan Aeronautics Share Price – NSE: HAL

एलारा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मंगळवारी हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी शेअर 4,255.30 रुपयांवर ट्रेड करत होता. हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या २.८५ लाख कोटी रुपये आहे. एलारा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ५४६५ रुपये टार्गेट प्राईससह ‘बाय’ कॉल दिला आहे. तसेच फिलिप कॅपिटल ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ५५०० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Bharat Dynamics Share Price – NSE: BDL

एलारा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. सध्या भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप ४४.७३ हजार कोटी रुपये आहे. एलारा सिक्युरिटीज फर्मने भारत डायनॅमिक्स शेअरसाठी ‘बाय’ कॉल देताना टार्गेट प्राइस 1230 रुपयांवरून 1300 रुपयांपर्यंत वाढवली आहे. फिलिप कॅपिटल ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी १४०० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Data Patterns Share Price – NSE: DATAPATTNS

मंगळवारी डेटा पॅटर्न लिमिटेड कंपनीचा शेअर 2,513 रुपयांवर ट्रेड करतोय. डेटा पॅटर्न लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 14.23 हजार कोटी रुपये आहे. फिलिप कॅपिटल ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी बाय रेटिंग सह ३४०० रुपये टार्गेट प्राइस दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BEL Vs HAL Share Price Tuesday 24 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

BEL Vs HAL Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x