25 December 2024 5:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री बोनस मिळवा, कंपनीची घोषणा, 4 पटीने वाढवा संपत्ती, फायदा घ्या - NSE: GARFIBRES SBI Mutual Fund | फंड असावा तर असा, अनेक पटीने मिळेल परतावा, मार्ग श्रीमंतीचा आहे ही SBI फंडाची योजना Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा - NSE: TATAPOWER IPO Watch | आला रे आला 13 रुपयांचा स्वस्त IPO आला, झटपट मल्टिबॅगर कमाई होईल, संधी सोडू नका - IPO GMP Penny Stocks | 3 रुपयाच्या पेनी शेअरने 1 वर्षात गरिबांना करोडपती केलं, सतत पैशाचा पाऊस पाडणारा शेअर - Penny Stocks 2024
x

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनी पेनी स्टॉक फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. जवळपास ऑगस्ट २०२४ पासून व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये सातत्याने घसरण होत आहे. व्होडाफोन आयडिया शेअर आता 19.18 रुपयांवरून घसरून 7.51 रुपयांवर पोहोचला आहे. मंगळवार, 24 डिसेंबर 2024 रोजी व्होडाफोन आयडिया शेअर 0.54 टक्के वाढून 7.51 रुपयांवर पोहोचला होता. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाकडून डेटा जाहीर

आता व्होडाफोन आयडिया शेअर्स गुंतवणूकदारांसाठी पुन्हा टेन्शन वाढवणारी बातमी आली आहे. कारण, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने ऑक्टोबरमध्ये ग्राहकांशी संबंधित अधिकृत डेटा जाहीर केला आहे. या डेटानुसार व्होडाफोन आयडिया कंपनीच्या ग्राहकांची संख्या अजून घटली आहे.

व्होडाफोन आयडियाचे ग्राहक घटले आणि एअरटेलचे ग्राहक वाढले

व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने ऑक्टोबरमध्ये १९.७७ लाख ग्राहक गमावले होते. म्हणजेच १९.७७ लाख ग्राहकांनी आपले मोबाईल क्रमांक पोर्ट केले होते. मात्र दुसरीकडे व्होडाफोन आयडियाचा मुख्य स्पर्धक असलेल्या एअरटेलचे ग्राहक वाढले आहेत. एअरटेलने ऑक्टोबरमध्ये एकूण १९.२८ लाख नवीन ग्राहक जोडले आहेत.

दरम्यान, इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनीने जाहीर केले आहे की, ‘व्होडाफोन ग्रुप पीएलसीच्या भागधारकांनी एकत्रितपणे कंपनीतील आपला संपूर्ण हिस्सा विकला आहे. त्यामुळे भारती एअरटेल लिमिटेड, व्होडाफोनचे भागधारक आणि इंडस टॉवर्स यांच्यात व्होडाफोनचे हक्क आणि जबाबदाऱ्यांबाबत झालेला शेअरहोल्डर्सचा करार संपुष्टात आला आहे.

म्युच्युअल फंडांकडून शेअर्सची विक्री

म्युच्युअल फंड कंपन्यांनी व्होडाफोन आयडिया शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. नोव्हेंबरमध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांनी व्होडाफोन आयडिया शेअर्सची प्रचंड प्रमाणात विक्री केली आहे. प्राइस डेटा-बेस अहवालानुसार, ‘नोव्हेंबर महिन्यात म्युच्युअल फंडांनी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचे १६.३९ कोटी शेअर्स विकले आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price Tuesday 24 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x