25 December 2024 6:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री बोनस मिळवा, कंपनीची घोषणा, 4 पटीने वाढवा संपत्ती, फायदा घ्या - NSE: GARFIBRES SBI Mutual Fund | फंड असावा तर असा, अनेक पटीने मिळेल परतावा, मार्ग श्रीमंतीचा आहे ही SBI फंडाची योजना Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा - NSE: TATAPOWER IPO Watch | आला रे आला 13 रुपयांचा स्वस्त IPO आला, झटपट मल्टिबॅगर कमाई होईल, संधी सोडू नका - IPO GMP
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, स्टॉक चार्टवर स्पष्ट संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: TATASTEEL

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | मंगळवार, २४ डिसेंबर रोजी शेअर बाजारात फ्लॅट ट्रेडिंग सुरु होती. दरम्यान, २०२४ या वर्षाचा शेवट स्टॉक मार्केटसाठी नकारात्मक ठरला आहे. स्टॉक मार्केट निफ्टीने 26277 ची पातळी गमावली आणि सध्या तो 23750 च्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे. त्यामुळे २०२५ हे वर्ष स्टॉक मार्केटसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच ट्रम्प अमेरिकेत सत्तेवर येत असून त्यांच्या सरकारची नवीन धोरणे देशांतर्गत शेअर बाजारासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. दरम्यान, ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले. (टाटा स्टील कंपनी अंश)

टाटा स्टील स्टॉकची सध्याची स्थिती

मंगळवार, 24 डिसेंबर 2024 रोजी टाटा स्टील कंपनी शेअर 0.57 टक्के घसरून 140.90 रुपयांवर पोहोचला होता. टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 184.60 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 128.20 रुपये होता. टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,75,706 कोटी रुपये आहे.

अरिहंत कॅपिटल ब्रोकिंग फर्म – टाटा स्टील शेअरबाबत सल्ला

अरिहंत कॅपिटल ब्रोकिंग फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘SELL’ कॉल दिला आहे. अरिहंत कॅपिटल ब्रोकिंग फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी 124 ते 116 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. अरिहंत कॅपिटल ब्रोकिंग फर्मच्या मते टाटा स्टील कंपनी शेअर 140.90 रुपयांवरून आता 124 ते 116 रुपयेपर्यंत घसरू शकतो.

अरिहंत कॅपिटल ब्रोकिंग फर्म – टाटा स्टील दैनंदिन चार्ट

अरिहंत कॅपिटल ब्रोकिंग फर्मच्या मते टाटा स्टील लिमिटेड कंपनीच्या दैनंदिन चार्टवर लोअर टॉप लोअर बॉटम फॉर्मेशन संकेत दिसत आहेत. शिवाय, टाटा स्टीलचा मोमेंटम इंडिकेटर ‘आरएसआय’ नकारात्मक संकेत देत आहे. बेंचमार्क निर्देशांकांच्या तुलनेतही टाटा स्टील कंपनी शेअर कमी कामगिरी करत आहे. टाटा स्टील दैनंदिन चार्टवरील या संकेतानुसार टाटा स्टील कंपनी शेअरमधील घसरणीचा ट्रेंड कायम राहील असे अरिहंत कॅपिटल ब्रोकरेजने म्हटले आहे. म्हणजे येत्या काही आठवड्यांत टाटा स्टील कंपनी शेअर १२४ ते ११६ रुपयांपर्यंत घसरू शकतो. त्यामुळे सध्याच्या पातळीवर टाटा स्टील शेअर ‘SELL’ करावा असा सल्ला अरिहंत कॅपिटल ब्रोकरेजने दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Steel Share Price Tuesday 24 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(125)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x