26 December 2024 9:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | मंगळवारी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. मंगळवारच्या तेजीनंतर शेअर 908.55 रुपयांवर पोहोचला होता. मंगळवारी टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीचा शेअर 2.15 टक्क्यांनी वधारून 908.55 रुपयांवर बंद झाला होता. मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग सुरु होताच हा शेअर 891 रुपयांवर ओपन झाला होता. मंगळवारी दिवसभरात या शेअरने 922.90 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता, तर दिवसभरात 888 रुपयांचा निच्चांकी स्तर गाठला होता. (टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी अंश)

टाटा टेक्नॉलॉजी कंपनी शेअरचा ट्रेंड कसा आहे?

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा शेअर ३० नोव्हेंबर २०२३ रोजी स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध करण्यात आला होता. टाटा टेक्नॉलॉजी कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा दिला होता. आयपीओ शेअर प्राइसपेक्षा १४० टक्के प्रीमियमवर शेअर सूचिबद्ध झाला होता. सध्या हा शेअर 908.55 रुपयांवर ट्रेड करत आहे. मंगळवार, 24 डिसेंबर 2024 पर्यंत टाटा टेक्नॉलॉजी कंपनी शेअरमध्ये मोठे चढ-उतार झाले पाहायला मिळाले असले तरी या शेअरने पोझिशनल गुंतवणूकदारांना ७५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

दरम्यान, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा शेअर 1400 रुपयांच्या (30 नोव्हेंबर 2023) आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरावरून 30 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा टेक्नॉलॉजी कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा दिला आहे. या कालावधीत हा शेअरची किंमत २५ टक्क्यांनी घसरली आहे.

हा शेअर खरेदी करावा का?

टाटा टेक्नॉलॉजी शेअर्सबाबत तज्ज्ञांकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत. टेक्निकल इंडिकेटरवर तेजीचे संकेत दिसत आहेत. शेअर बाजार तज्ज्ञ ए. आर. रामचंद्रन यांनी टाटा टेक्नॉलॉजी शेअरबाबत म्हटलं आहे की, ‘हा शेअर डेली चार्टवर ९२० रुपयांवर मजबूत रेझिस्टन्ससह खूप ओव्हरसोल्ड असल्याचं दिसतंय. गुंतवणूकदार १०१६ रुपये टार्गेट प्राईससाठी हा शेअर होल्ड करू शकतात. टाटा टेक्नॉलॉजी शेअरला ८३२ रुपयांवर सपोर्ट मिळत आहे असं देखील ए. आर. रामचंद्रन यांनी म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Technologies Share Price Wednesday 25 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x