27 December 2024 1:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 49 पैसे ते 85 पैशाचे 3 पेनी शेअर्स खरेदीला गर्दी, अप्पर सर्किट हिट, मालामाल करत आहेत - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | मल्टिबॅगर HUDCO सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: HUDCO Income Tax on Salary | 5 लाख रुपयेपर्यंत वार्षिक पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी खुशखबर, बजेटमध्ये घोषणा होणार EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा IPO Watch | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह तपशील जाणून घ्या - IPO GMP HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC
x

Bonus Share News | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला तुफान गर्दी - NSE: SURYAROSNI

Bonus Share News

Bonus Share News | सूर्या रोशनी लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. सूर्या रोशनी लिमिटेड कंपनी गुंतवणूकदारांना एका शेअरवर एक फ्री बोनस शेअर देणार आहे. यासाठी सूर्या रोशनी कंपनीकडून रेकॉर्ड तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. सूर्या रोशनी कंपनीने जाहीर केलेली रेकॉर्ड डेट 2025 मधील आहे. त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांसाठी सुद्धा सुवर्ण संधी चालून आली आहे. (सूर्या रोशनी लिमिटेड कंपनी अंश)

फ्री बोनस शेअर्स रेकॉर्ड तारीख

सूर्या रोशनी लिमिटेड कंपनीने एक्सचेंजला फायलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, ‘5 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या १ शेअरवर १ शेअर बोनस दिला जाईल. सूर्या रोशनी लिमिटेड कंपनीने या बोनस शेअरसाठी १ जानेवारी २०२५ ची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात १ जानेवारी २०२५ या तारखेपर्यंत कंपनीचे शेअर्स असतील त्यांनाच बोनस शेअर्सचा लाभ मिळणार आहे.

2023 मध्ये सूर्या रोशनी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सचे विभाजन करण्यात आले होते. त्यानंतर सूर्या रोशनी लिमिटेड कंपनीचे शेअर्स २ भागात विभागले गेले होते. त्या शेअर विभाजनानंतर सूर्या रोशनी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू प्रति शेअर २ रुपयांपर्यंत खाली आली होती. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सूर्या रोशनी लिमिटेड कंपनीने एक्स-डिव्हिडंड ट्रेड केला होता. त्यानंतर सूर्या रोशनी लिमिटेड कंपनीने पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर २.५० रुपये लाभांश दिला.

सूर्या रोशनी कंपनी शेअरची सध्याची स्थिती

गुरुवार, 26 डिसेंबर 2024 रोजी सूर्या रोशनी कंपनी शेअर 1.77 टक्के वाढून 563.40 रुपयांवर पोहोचला होता. सूर्या रोशनी कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 841.65 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 467.55 रुपये होता. सूर्या रोशनी लिमिटेड कंपनीचेएकूण मार्केट कॅप 6,163 कोटी रुपये आहे.

कंपनीने 627 टक्के परतावा दिला

मागील दोन वर्षांत सूर्या रोशनी लिमिटेड कंपनीने पोझिशनल गुंतवणूकदारांना १४५ टक्के परतावा दिला आहे. तर ज्या गुंतवणूकदारांनी सूर्या रोशनी कंपनीचे शेअर्स 5 वर्षे होल्ड केले होते, त्यांना 627 टक्के परतावा मिळाला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bonus Share News on Surya Roshni Share Price Thursday 26 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Bonus Share News(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x