27 December 2024 3:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, यापूर्वी 5121% परतावा दिला - BSE: 512008 Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Gold Rate Today | बापरे, लग्नसराईच्या हंगामात आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या DSP Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, महिना SIP बचतीवर मिळतील 1 कोटी 11 लाख रुपये, संधी सोडू नका Penny Stocks | 49 पैसे ते 85 पैशाचे 3 पेनी शेअर्स खरेदीला गर्दी, अप्पर सर्किट हिट, मालामाल करत आहेत - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | मल्टिबॅगर HUDCO सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: HUDCO Income Tax on Salary | 5 लाख रुपयेपर्यंत वार्षिक पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी खुशखबर, बजेटमध्ये घोषणा होणार
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर आठवडाभरात ५ टक्के, मागील १ महिन्यात २ टक्के आणि तीन महिन्यांत २० टक्क्यांनी घसरला आहे. अशातच सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. याबाबत सुझलॉन एनर्जी कंपनीने स्टॉक मार्केटला फायलिंगमार्फत माहिती दिली आहे. त्यामध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीने म्हटले आहे की, ‘सदर प्रकरण सुझलॉन विंड इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी संबंधित आणि जुनं प्रकरण आहे. (सुझलॉन कंपनी अंश)

सुझलॉन कंपनीने काय माहिती दिली

सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने म्हटले आहे की, ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीची उपकंपनी असलेल्या सुझलॉन विंड इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी संबंधित हे प्रकरण आहे. साधारण १० वर्षांपूर्वी म्हणजे २०१६-१७ या आर्थिक वर्षापर्यंत पूर्ण झालेल्या शिपमेंटसाठी निवडक निर्यात उत्पन्न मिळण्यास विलंब केल्याबद्दल उपकंपनीला सक्तवसुली संचालनालयाच्या हैदराबाद शाखेकडून दंडाची नोटीस प्राप्त झाली आहे.

जुनं प्रकरण आता संपुष्टात आलं आहे

सक्तवसुली संचालनालय हैदराबादच्या सहसंचालक कार्यालयाने सुझलॉन विंड इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण आर्थिक वर्ष 2017 पर्यंत केलेल्या शिपमेंट आणि निर्यात उत्पन्न प्राप्त होण्यास उशीर होण्याशी संबंधित आहे. हे प्रकरण जुने असून ते आता संपुष्टात आलं आहे अशी माहिती कंपनीने स्टॉक मार्केटला दिली आहे.

सुझलॉन कंपनीत एफआयआय’ची हिस्सेदारी वाढतेय

सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची म्हणजे एफआयआय’ची हिस्सेदारी वाढत असल्याचे स्टॉक मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीची आर्थिक स्थिती सुधारली असून नवीकरणीय ऊर्जेसंबंधित मोठ्या कॉन्ट्रॅक्टचा कंपनीला फायदा झाला आहे.

मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म – शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस

मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, ‘गेल्या काही तिमाहीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा वाढला आहे. अनेक तिमाहींनंतर एफआयआयचा शेअर्समधील हिस्सा १० टक्क्यांहून अधिक वाढला आहे. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने सुझलॉन शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजने सुझलॉन शेअरला ‘ओव्हरवेट’ रेटिंग देताना ७१ रुपये ही शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Thursday 26 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(279)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x