19 April 2025 12:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट

EPFO Pension Alert

EPFO Pension Alert | डिसेंबर महिना लवकरच संपणार आहे. नवे वर्ष धडकणार आहे. दरम्यान, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी 2025 हे वर्ष आनंदाचे ठरू शकते. अर्थसंकल्पात त्यांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे खासगी क्षेत्रातील कर्मचारी महागाई भत्त्यासारख्या सुविधांपासून दूर राहतात. पण आता येत्या अर्थसंकल्पात सरकार त्यांच्या ईपीएफओमधील मूळ वेतनवाढीबाबत निर्णय घेऊ शकते, अशी त्यांना आशा आहे. यामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होऊ शकते.

मूळ वेतन सध्याच्या 15,000 रुपयांवरून 21,000 रुपये करण्याच्या तयारी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मूळ वेतन सध्याच्या 15,000 रुपयांवरून 21,000 रुपये करण्याच्या तयारीत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि ईपीएफ योगदानाच्या रकमेत वाढ होणार आहे. यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता वाढेल. ही योजना लागू झाल्यास त्याचा थेट फायदा खासगी कर्मचाऱ्यांना होणार आहे.

खासगी कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार?

2014 पासून पेन्शनची गणना 15 हजार रुपये करण्यात आली आहे. आता त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. हा बदल लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक स्वास्थ्य मजबूत होईल. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे मासिक वेतनात कपात होऊ शकते. याचे कारण म्हणजे अधिक पैसा ईपीएफओकडे (एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन) जाईल. पण ते त्यांच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. उदाहरणार्थ, पेन्शनची मर्यादा 15,000 रुपयांवरून 21,000 रुपये केली तर कर्मचाऱ्यांना दरमहा 2,550 रुपये अधिक पेन्शनचा लाभ मिळू शकतो.

अर्थसंकल्प 2025 मध्ये मोठी घोषणा होण्याची शक्यता

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्थ मंत्रालय आणि कामगार मंत्रालय या प्रस्तावाला अंतिम रूप देण्याच्या तयारीत आहेत. त्याची अंमलबजावणी केव्हा होणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अशा तऱ्हेने अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प २०२५ मध्ये कर्मचाऱ्यांना खुशखबर देऊ शकतात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Pension Alert Thursday 26 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPFO Pension Alert(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या