28 December 2024 5:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धना मदरसन शेअर फोकसमध्ये, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: MOTHERSON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Post Office Scheme | महिना खर्चाचं टेन्शन मिटेल, पोस्टाची ही योजना प्रत्येक महिन्याला 9250 रुपये देईल, फायद्या घ्या SIP Mutual Fund | पैशाचा मॅजिक फॉर्म्युला, 21 व्या वर्षापर्यंत तुमचा मुलगा देखील होईल कोटींचा मालक; फक्त हा फॉर्म्युला फॉलो करा Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 30% परतावा दिला, खरेदीला तुफान गर्दी - Penny Stocks 2024
x

Income Tax on Salary | 5 लाख रुपयेपर्यंत वार्षिक पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी खुशखबर, बजेटमध्ये घोषणा होणार

Income Tax on Salary

Income Tax on Salary | केंद्र सरकार आगामी अर्थसंकल्पात प्राप्तिकर कमी करण्याचा विचार करत आहे. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने दावा करण्यात आला आहे की, इन्कम टॅक्समधील या संभाव्य कपातीचा फायदा ज्यांचे वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना मिळू शकते. रॉयटर्सने नुकत्याच दिलेल्या वृत्तानुसार, फेब्रुवारी २०२५ मध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार आयकर कमी करण्याचा विचार करत आहे. प्रामुख्याने मध्यमवर्गीय आणि शहरी भागात राहणाऱ्या लोकांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलले जाऊ शकते.

मध्यमवर्गाला मिळणार दिलासा

अहवालानुसार, शहरी भागात राहणाऱ्या लोकांना राहणीमानाचा खर्च जास्त आणि पगारात किंचित वाढ झाल्यामुळे अनेकदा आर्थिक दबावाला सामोरे जावे लागते. इन्कम टॅक्स कमी केल्याने त्यांच्या हातात अधिक पैसा येईल, ज्यामुळे त्यांची खर्च करण्याची शक्ती वाढेल, असा सरकारचा विश्वास आहे. यामुळे वैयक्तिक खर्चात तर सुधारणा होईलच, शिवाय भारतीय अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल. या बदलाचा सर्वात मोठा फायदा ज्यांचे वार्षिक उत्पन्न १५ लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नव्या करप्रणालीला चालना मिळणार

2020 मध्ये लागू करण्यात आलेल्या नवीन कर प्रणालीनुसार, 3 लाख ते 15 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 5% ते 20% कर आकारला जातो. मात्र, घरभाडे, विमा अशा सवलतींचा लाभ मिळत नाही. कराचे दर कमी करून अधिक लोक सोपी आणि कमी गुंतागुंतीची असलेली ही नवी प्रणाली स्वीकारतील, असा सरकारचा विश्वास आहे.

कर कपातीचा परिणाम काय?

या संभाव्य करकपातीचा कोणताही दर या अहवालात नमूद करण्यात आलेला नाही. तरीही या निर्णयामुळे सरकारच्या महसुलात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. परंतु दीर्घ काळासाठी हा निर्णय करअनुपालन आणि करदात्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रभावी ठरू शकतो आणि कर संकलनात स्थैर्य आणू शकतो.

सरकारची लोकप्रियता वाढेल

कराचे दर कमी करण्याची मागणी मध्यमवर्ग अनेक दिवसांपासून करत आहे. वाढती महागाई आणि पगारात झालेली अत्यल्प वाढ यामुळे लोकांना आपल्या आर्थिक स्थितीची चिंता सतावत आहे. प्राप्तिकर कपातीमुळे त्यांना आर्थिक दिलासा तर मिळेलच, शिवाय मध्यमवर्गीयांमध्ये सरकारची लोकप्रियता वाढण्यासाठीही हे पाऊल उपयुक्त ठरू शकते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Income Tax on Salary Friday 27 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Income Tax on Salary(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x