29 December 2024 12:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर सह हे 3 शेअर्स 'पॉवर' दाखवणार, कमाईची मोठी संधी सोडू नका - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन सहित या 3 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत परतावा मिळणार - NSE: SUZLON Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा ग्रुपचा IPO येतोय, अशी संधी वारंवार मिळणार नाही, तपशील नोट करा - GMP IPO IRFC Share Price | IRFC सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धना मदरसन शेअर फोकसमध्ये, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: MOTHERSON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
x

IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर ब्रेकआऊट देणार. तज्ज्ञांनी दिले तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC

IRFC Share Price

IRFC Share Price | शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजार मजबूत तेजीसह बंद झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये आनंदच वातावरण होतं. नवीन वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी स्टॉक मार्केटने सकारात्मक संकेत दिले आहेत. 2024 या वर्षाचा शेवट म्हणजे मागील काही दिवस शेअर बाजारासाठी नकारात्मक ठरले होते. त्यामुळे नवीन वर्षात गुंतवणूकदार चांगल्या शेअर्सच्या शोधात आहेत. दरम्यान, शेअर बाजार तज्ज्ञांनी आयआरएफसी शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. यापूर्वी आयआरएफसी शेअरने गुंतवणूदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)

आयआरएफसी शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी आयआरएफसी शेअर 0.57 टक्के घसरून 146.05 रुपयांवर पोहोचला होता. आयआरएफसी कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 229 रुपये होता, तर आयआरएफसी शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 96.05 रुपये होता. आयआरएफसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,91,205 कोटी रुपये आहे.

आयआरएफसी शेअर टार्गेट प्राईस

ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर शेअर बाजार विश्लेषकांनी सल्ला देताना सांगितले की, ‘आयआरएफसी शेअरला १३० रुपयांच्या पातळीवर मजबूत सपोर्ट आहे. आयआरएफसी शेअर 160 ते 165 रुपयांच्या पातळीवर पोहोचताच तेथून ब्रेकआऊट दिसू शकतो. या पातळीपासून आयआरएफसी शेअरमध्ये तेजी पाहायला मिळू शकते. 160-165 रुपयांच्या पातळीवर ब्रेकआऊट होताच आयआरएफसी शेअर 180 ते 185 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

आयआरएफसी शेअरने 488 टक्के परतावा दिला

शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 पासून मागील ५ दिवसात आयआरएफसी शेअर 4.60% घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 2.95% घसरला आहे. मागील ६ महिन्यात आयआरएफसी शेअर 15.66% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 51.03% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात आयआरएफसी शेअरने 488.91% परतावा दिला आहे. YTD आधारवर आयआरएफसी शेअरने 45.47% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price Friday 27 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(118)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x