3 January 2025 1:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Car Buying Tips | नवीन वर्षात घरासमोर उभी करा नवीकोरी कार, अशा पद्धतीने डील केल्यास मिळेल जास्तीत जास्त फायदा SIP Mutual Fund | गुंतवणूकदारांसाठी जानेवारी धमाका, एकूण 4 इक्विटी योजना होणार लॉन्च, जाणून घ्या तारीख NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी BUY रेटिंग, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Waaree Energies Share Price | वारी एनर्जीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: WAAREEENER Wipro Share Price | आयटी विप्रो शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, 33 टक्के परतावा मिळेल - NSE: WIPRO Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | या पेनी शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, 17 जानेवारी पूर्वी फायदा घ्या - BOM: 539519
x

UPI New Rule | 1 जानेवारीपासून UPI चा नवा नियम लागू; आधीपेक्षा जास्त पैसे होतील ट्रान्सफर, किती लिमिट वाढवली आहे पहा

UPI New Rule

UPI New Rule | 1 जानेवारीपासून बऱ्याच गोष्टींमध्ये आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये नवनवीन नियम लागू होणार आहेत. त्याचबरोबर यूपीआय ट्रांजेक्शनच्या देखील काही नियमांमध्ये मोठ्याबद्दल होणार आहे. यूपीआयच्या नव्या नियमाचा तुम्हाला नेमका काय फायदा होणार आहे हे आज आम्ही सांगणार आहोत.

माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार असं समजून आलं आहे की, RBI च्या निर्णयानुसार UPI 123pay मधील ट्रांजेक्शन लिमिटमध्ये बदल केले जाणार. म्हणजेच भारतीय रिझर्व बँकेने यूपीआय ट्रांजेक्शनच्या लिमिटमध्ये बदल घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमाप्रमाणे बँक खातेधारक UPI 123pay मार्फत 5 नाही तर, 10 हजारांचे ट्रांजेक्शन करता येणार आहे.

UPI 123PAY म्हणजे नेमकं काय :

UPI युजर्सला UPI 123pay ही सर्विस दिली जाते. या सर्विसच्या माध्यमातून यूजर इंटरनेटशिवाय पेमेंट करू शकतो. आरबीआयच्या ट्रांजेक्शनमध्ये आता बदल केले गेले आहेत. येत्या एक जानेवारीपासून संपूर्ण नवीन नियम अवलंबता येणार आहेत. यामध्ये युजर्सला पेमेंट साठीचे एकूण 4 ऑप्शन देण्यात येतात. ज्यामध्ये मिस कॉल, IVR नंबर्स, साऊंड बेस्ड टेक्नॉलॉजी आणि OEM-embedded Apps यांचा समावेश असतो.

डेडलाईन जाणून घ्या :

UPI च्या नव्या नियमावलीप्रमाणे युजर्सला 1 जानेवारी 2025 या तारखेनंतर 5 च्या ऐवजी 10 हजार रुपये ट्रान्सफर करता येणार आहेत. दरम्यान यामध्ये OTP बेस्ड सर्विस देखील ऍड केली जाणार आहे. याचाच अर्थ असा की, तुम्हाला पेमेंट करण्यासाठी ओटीपीची गरज भासणार. युजर्सची संपूर्ण सिक्युरिटी लक्षात घेऊनच या सर्व गोष्टी केल्या जाणार आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | UPI New Rule Saturday 28 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#UPI New Rule(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x