3 January 2025 12:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Car Buying Tips | नवीन वर्षात घरासमोर उभी करा नवीकोरी कार, अशा पद्धतीने डील केल्यास मिळेल जास्तीत जास्त फायदा SIP Mutual Fund | गुंतवणूकदारांसाठी जानेवारी धमाका, एकूण 4 इक्विटी योजना होणार लॉन्च, जाणून घ्या तारीख NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी BUY रेटिंग, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Waaree Energies Share Price | वारी एनर्जीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: WAAREEENER Wipro Share Price | आयटी विप्रो शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, 33 टक्के परतावा मिळेल - NSE: WIPRO Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | या पेनी शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, 17 जानेवारी पूर्वी फायदा घ्या - BOM: 539519
x

Business Idea | गृहिणींनो इकडे लक्ष द्या; आता घरबसल्या स्वावलंबी व्हा, कमी पैशांत सुरू होणारे जबरदस्त व्यवसाय

Business Idea

Business Idea | प्रत्येक गृहिणीकडे घर, संसार, मूलबाळ सांभाळून फावला वेळ उरलेला असतो. या वेळामध्ये आपणही घरगुती का होईना पण एखादा बिजनेस सुरू करावा असं प्रत्येक गृहिणीला वाटत असतं. सध्या सोशल मीडियाचं क्रेज वाढतच आलेले आहे. उरलेल्या वेळामध्ये बऱ्याच गृहिणी मोबाईल फोनवर रील किंवा मजेशीर आणि गमतीशीर व्हिडिओ स्क्रोल करत राहतात. त्याऐवजी तुम्ही साईड इन्कम बिझनेस करून महिन्याला भरपूर पैसे कमवू शकता.

आज या बातमीपत्रातून आम्ही तुम्हाला साईड इन्कमच्या काही बिझनेस आयडिया सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला अगदी कमी पैशांत गुंतवणूक करून तुमचा बिजनेस सुरू करता येऊ शकतो.

ऑनलाइन क्लासेस :

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन क्लासेस घेतले जातात. यामध्ये मेकअप आर्टिस्ट कोर्स, बेकिंग कोर्स, डान्स क्लास, योगा क्लासेस यांसारख्या विविध गोष्टींचा समावेश होतो. तुम्ही देखील घरच्या घरी तुमच्यामधील कलेला वाव मिळण्यासाठी सोशल मीडिया ऑनलाईन माध्यम वापरू शकता.

Youtube चैनल उघडा :

बऱ्याच व्यक्ती खवय्ये असतात तर, काहींना भटकंती करायला आवडते. अशा मनोरंजित व्यक्तींनी एखादा youtube चैनल उघडून गमतीशीर आणि प्रेक्षकांना आवडतील असे कंटेंट शोधून स्वतःचे youtube चैनल उघडले पाहिजे. तुम्हाला चांगल्या प्रतिसाद मिळाल्यानंतर कालांतराने यूट्यूब चैनलच्या माध्यमातून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता.

DIY :

तुम्ही तुमची कलाकृती सादर करून देखील स्वतःचा छोटा बिझनेस उघडू शकता. ज्यामध्ये हाताने बनवलेल्या सुबक अशा वस्तूंचा समावेश असू शकतो. यामध्ये तुम्ही भिंतींवर लटकणारे शोपीस, सुंदर असे हाताने ही विणलेले तोरण, शॉल, टोपी, शोभेच्या वस्तू, चिनी मातींचे दिवे यांसारख्या विविध वस्तू बनवू शकता.

केटरिंग :

बहुतांश गृहिणींच्या हाताला भारी चव असते. तुम्ही तुमची पाककलाकृती केटरिंग व्यवसायात वापरू शकता. तसं पाहायला गेलं तर, शनिवार आणि रविवार वीकेंडला कोणाचे तरी प्रोग्राम्स असतातच. अशावेळी तुम्ही केटरिंग सुविधा पुरवून आणि स्वतःच्या चविष्ट रेसिपी इतरांना खाऊ घालून साईड इन्कम देखील करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Business Idea Sunday 29 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Business Idea(83)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x