3 January 2025 3:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Car Buying Tips | नवीन वर्षात घरासमोर उभी करा नवीकोरी कार, अशा पद्धतीने डील केल्यास मिळेल जास्तीत जास्त फायदा SIP Mutual Fund | गुंतवणूकदारांसाठी जानेवारी धमाका, एकूण 4 इक्विटी योजना होणार लॉन्च, जाणून घ्या तारीख NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी BUY रेटिंग, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Waaree Energies Share Price | वारी एनर्जीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: WAAREEENER Wipro Share Price | आयटी विप्रो शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, 33 टक्के परतावा मिळेल - NSE: WIPRO Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | या पेनी शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, 17 जानेवारी पूर्वी फायदा घ्या - BOM: 539519
x

Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, अशी संधी सोडू नका - NSE: KPIGREEN

Bonus Share News

Bonus Share News | अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स जाहीर करत आहेत. केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी ही देखील त्यापैकीच एक आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी 2 शेअरवर 1 फ्री शेअर बोनस देत आहे. दीर्घ काळासाठी केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देखील दिला आहे. (केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी अंश)

बोनस शेअर रेकॉर्ड तारीख

केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर्स 3 जानेवारी 2025 रोजी एक्स-बोनस ट्रेड करतील. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती देताना म्हटले होते की, ‘पाच रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या प्रत्येकी दोन शेअर्सवर एक शेअर बोनस दिला जाईल. ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात ३ जानेवारी पर्यंत या कंपनीचे शेअर्स असतील त्यांना बोनस शेअर्सचा लाभ मिळणार आहे.

शेअरची सध्याची स्थिती

शनिवार, 28 डिसेंबर 2024 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी शेअर 0.72 टक्के वाढून 800.30 रुपयांवर पोहोचला होता. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,118 रुपये आणि शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 416.67 रुपये आहे. केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 10,491 कोटी रुपये आहे.

केपीआय ग्रीन एनर्जी शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला

गेल्या तीन वर्षांत केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने गुंतवणूकदारांना 807 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर YTD आधारावर केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी शेअरने 68.09% परतावा दिला आहे. तसेच मागील १ वर्षात या शेअरने 63.57% परतावा दिला आहे.

कंपनी स्टॉक स्प्लिट

2024 मध्येच केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी स्टॉक स्प्लिट करण्यात आला होता. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचा शेअर २ भागांमध्ये विभागला गेला होता. त्यानंतर केपीआय ग्रीन एनर्जीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू प्रति शेअर ५ रुपयांपर्यंत खाली आली होती. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने या वर्षी 3 वेळा एक्स-बोनस स्टॉक म्हणून व्यवहार केला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bonus Share News on KPI Green Energy Share Price Saturday 28 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Bonus Share News(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x