5 January 2025 2:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा OnePlus 13 | वनप्लस 13 स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि प्राईस डिटेल्स जाणून घ्या Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, जबरदस्त फंड, रु.9000 एसआयपी वर मिळेल 35 लाखांहून अधिक परतावा EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी मोठी अपडेट, मिळणार नवीन ATM कार्ड, EPF चे पैसे सहज काढता येणार Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, झटपट मोठी कमाई करा, रेकॉर्ड तारीख नोट करा Personal Loan | कर्जदारांसाठी अलर्ट, आता दर 15 दिवसांनी तुमचा क्रेडिट रेकॉर्ड तपासाला जाणार, हा फायदा देखील होईल
x

EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी खुशखबर, EPFO मध्ये झाला मोठा बदल, 2025 मध्ये नवे नियम लागू होणार

EPFO Passbook

EPFO Passbook | ईपीएफओ खातेधारकांसाठी येणार 2025 हे नववर्ष अत्यंत आनंदाचं असणार आहे. कारण की नव्या वर्षात अनेक नवीन गोष्टी घडणार आहेत. ज्यामध्ये नवनवीन नियम लागू होऊन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या नवीन नियमांचे एकच उद्दिष्टे आहे ते म्हणजे खातेधारकांना रिटायरमेंटपर्यंत मोठा फंडा तयार करण्यासाठी केली जाणारी मदत.

ईपीएफओच्या नव्या नियमांचा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह सर्वच कर्मचाऱ्यांना फायदा अनुभवता येणार आहे. दरम्यान ईपीएफओने बदललेल्या नियमानुसार कोणकोणत्या गोष्टी प्रस्तावित केल्या आहेत यावर नजर टाकूया.

नियम 1 – एटीएमच्या माध्यमातून पीएफचे पैसे काढणे :
ईपीएफओने लागू केलेल्या नव्या नियमांमध्ये सर्व सदस्यांना नव्या वर्षामध्ये एटीएमच्या माध्यमातून पीएफचे पैसे काढता येणार आहेत. म्हणजेच 2025-26 या वर्षापासून अगदी कोणत्याही वेळी आणि 24 तास तुम्ही तुमच्या पीएफमधील पैसे एटीएमच्या माध्यमातून काढू शकता. पूर्वी ईपीएफ खातेधारकाला पैसे काढण्यासाठी 7 ते 8 दिवसांपर्यंत वाट पहावी लागायची परंतु आता तुम्ही अधिक चटकन पैसे मिळवू शकणार आहात.

नियम 2 – कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये बदल :
बऱ्याच दिवसांपासून अशा चर्चा रंगल्या होत्या की, ईपीएफओ खातेधारकांना त्यांच्या बेसिक पगारात वेतन वाढ मिळणार आहे. सध्या कर्मचाऱ्याच्या पगारातील 12% रक्कम ईपीएफ खात्यात जमा केली जाते. दरम्यान सध्याच्या घडीला कर्मचाऱ्याला मूळ वेतन 15000 रुपये दिले जात आहे. हीच वेतन मर्यादा लवकरात लवकर वाढवली जाऊ शकते. अनेक ईपीएफओ कर्मचारी या नव्या नियमाच्या बदलाने खुश होणार आहेत. या गोष्टीचा बंपर फायदा म्हणजे प्रत्येक कर्मचारी मोठा रिटायरमेंट फंड जमा करू शकणार. त्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर मासिक पेन्शन देखील जास्तीत जास्त प्रमाणात मिळवता येईल.

नियम 3 – ईपीएफओ IT सिस्टम अपग्रेड :
ईपीएफओ लवकरात लवकर आपल्या आयटी सिस्टमला अपग्रेड करणार आहे. ज्याचा फायदा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुभवता येणार आहे. या अपग्रेडेशनचा कर्मचाऱ्यांना जबरदस्त लाभ घेता येणार आहे. कारण की यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर पेमेंटवर दावा करता येईल त्याचबरोबर कमीत कमी प्रमाणात मॅन्युअल हस्तक्षेप करावा लागेल. एवढेच नाही तर फसवाफसवीच्या गोष्टींपासून तुम्ही चार हात लांबच राहाल.

नियम 4 – कोणत्याही बँकेतून पेन्शनचे पैसे काढू शकता :
ईपीएफओ अंतर्गत येणाऱ्या सर्व पेन्शनधारकांसाठी येणारं नवीन वर्ष कमालीचं असणार आहे. कारण की यामध्ये कर्मचारी अगदी कोणत्याही बँकेतून पेन्शनचे पैसे काढू शकणार आहे. या पेन्शन सुविधेमुळे टेन्शन धारकाला विविध लाभांचा अनुभव घेता येईल. ज्यामध्ये पेन्शन काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही. त्याचबरोबर तुम्ही एखाद्या ठिकाणी यात्रा करण्यास गेला तर तुम्हाला सुविधा मिळेल. यामध्ये वेळेची बचत देखील होऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला बँक बदलायची असेल तर यासाठी देखील अतिशय सोपी प्रोसेस दिली गेली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Passbook Monday 30 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO Passbook(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x