5 January 2025 1:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज फर्म बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: INFY NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPCGREEN CIBIL Score | पगारदारांनो, या 5 स्टेप्स फॉलो करा, तुमचा सिबिल स्कोर कधीही खराब होणार नाही, जाणून घ्या फायद्याची बातमी Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या Sarkari Yojana | सरकार देईल कर्ज, स्वतःचा स्टार्टअप सुरू करा, 'या' योजना देतात झटपट लोन, जाणून घ्या सविस्तर SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा
x

IREDA Share Price | इरेडा सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA

IREDA Share Price

IREDA Share Price | देशांतर्गत स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांसाठी २०२४ हे वर्ष खूप सकारात्मक ठरले आहे. एनएसई निफ्टी २६,२०० वर पोहोचला होता, तर बीएसई सेन्सेक्स देखील ८६,००० अंकांवर पोहोचला होता. पण सप्टेंबर महिन्यापासून मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. तसेच या महिन्यात सुरू झालेल्या विक्री आणि घसरणीमुळे स्टॉक मार्केट ९ ते १० टक्क्यांनी घसरला होता. आता २०२५ ला सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने शेअर बाजार विश्लेषकांनी ३ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.

इंडिगो शेअर टार्गेट प्राईस

मार्केट गुरु अनिल सिंघवी यांनी इंडिगो कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. अनिल सिंघवी यांनी इंडिगो कंपनी शेअरसाठी पहिली टार्गेट प्राईस 5300 रुपये, दुसरी टार्गेट प्राईस 5800 रुपये आणि तिसरी टार्गेट प्राईस 6500 रुपये जाहीर केली आहे. तज्ज्ञांनी दिलेली टार्गेट प्राईस इंडिगो शेअरच्या सध्याच्या पातळीपेक्षा ४० टक्क्यांनी अधिक आहे. सध्या इंडिगो शेअर 4,557.65 रुपयांवर ट्रेड करतोय.

तुतीकोरिन अल्कली केमिक्स आणि एफआरटीएलझर्स शेअर टार्गेट प्राईस

स्टॉक मार्केट तज्ज्ञ संदीप जैन यांनी तुतीकोरिन अल्कली केमिक्स कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. संदीप जैन यांनी तुतीकोरिन अल्कली केमिक्स कंपनी शेअरसाठी 130 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तज्ज्ञांनी दिलेली टार्गेट प्राईस तुतीकोरिन अल्कली केमिक्स शेअरच्या सध्याच्या पातळीपेक्षा 49 टक्क्यांनी अधिक आहे. सध्या तुतीकोरिन अल्कली केमिक्स शेअर 100.62 रुपयांवर ट्रेड करतोय.

इरेडा शेअर टार्गेट प्राईस

आनंद राठी ब्रोकरेज फर्मने इरेडा शेअरसाठी आपले कव्हरेज सुरू केले आहे. आनंद राठी ब्रोकरेज फर्मने इरेडा शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजने इरेडा शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह २६५ रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. मंगळवार, 31 डिसेंबर 2024 रोजी इरेडा शेअर 1.87 टक्क्यांनी घसरून 214.38 रुपयांवर पोहोचला होता. मागील १ वर्षात इरेडा शेअरने 104.92% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 104 टक्के परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price Tuesday 31 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x