Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
Smart Investment | आज 1 जानेवारी 2025. नव्या वर्षाचा नवा दिवस. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी बऱ्याच व्यक्ती काहीतरी नव करून पाहण्याचा संकल्प निर्धारित करतात. काही गुंतवणूकदार तर, नवीन वर्षामध्ये एखाद्या जबरदस्त परतावा देणाऱ्या योजनेमध्ये पैसे गुंतवतात.
आपल्या कुटुंबाच्या त्याचबरोबर स्वतःच्या देखील भविष्याची चिंता लक्षात घेऊन गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. तुम्ही सुद्धा गुंतवणूक करण्यासाठी एखादा नवीन फंड किंवा एखादी योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी PPF म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही सरकारची योजना अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
PPF :
पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. बहुतांश व्यक्ती या पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये पैशांची गुंतवणूक करून मालामाल झाले आहेत. ही योजना तुम्हाला योग्य व्याजदर आणि योग्य परतावा प्रदान करते एवढेच नाही तर, योजनेची खास गोष्ट म्हणजे ही योजना सरकारी आहे त्यामुळे गुंतवणूकदारांचा पटकन विश्वास योजनेवर बसतो. सध्याच्या घडीला ही योजना गुंतवणूकदाराला वार्षिक आधारावर 7.1% व्याजदर प्रदान करत आहे.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये एका वर्षात कमीत कमी 500 तर, जास्तीत जास्त 1,50,000 रुपये गुंतवू शकतो. या योजनेचा कार्यकाळ 15 वर्षांचा दिला गेला आहे परंतु तुम्हाला योजनेमध्ये आणखीन पैसे गुंतवायचे असतील तर, 5-5 वर्षाच्या एक्सटेंड रुलनुसार तुम्ही योजना वाढवू शकता.
पोस्ट ऑफिस टीडी :
पोस्टची टाईम डिपॉझिट योजना देखील अत्यंत जबरदस्त योजना आहे. कारण की ही योजना तुम्हाला 7.5% वार्षिक आधारावर व्याजदर प्रदान करते. पोस्टाची टीडी ही एखाद्या बँकेतील एफडीप्रमाणेच काम करते. त्याचबरोबर ही टीडी योजना एक ते पाच वर्षांपर्यंत उपलब्ध आहेत. ज्यामध्ये 6.9 ते 7.5% पर्यंत व्याजदर प्रदान केले जाते. पोस्टाची टाईम डिपॉझिट म्हणजेचं टीडी योजना ही केंद्र सरकारच्या अंतर्गत चालवली जाते.
किसान विकास पत्र :
किसान विकास पत्र ही केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही तर सर्वसामान्य व्यक्तींसाठी देखील फायद्याची योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदार 1000 रुपयांपासून गुंतवणुकीची सुरुवात करू शकतो. ही योजना देखील तुम्हाला वार्षिक आधारावर 7.5% व्याजदर देते. ज्याचा बंपर फायदा गुंतवणूकदारांना मिळतो. किसान विकास पत्र या योजनेची खातीय म्हणजे तुम्ही यामध्ये तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकता. म्हणजेच गुंतवणुकीची कोणतीही लिमिट दिली गेली नाहीये.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Smart Investment Wednesday 01 January 2025 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 58 टक्केपर्यंत परतावा - NSE: ADANIENT
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
- Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या