7 January 2025 8:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, रेटिंग जाहीर, टार्गेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो, तिकीट बुकिंगवर मिळणार 50% डिस्काउंट, अशा पद्धतीने तिकीट बुकिंग करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गिफ्ट, महागाई भत्ता 55 टक्क्यांवर, पे-ग्रेडप्रमाणे रक्कम जाणून घ्या Home Loan Interest Rates | नवीन घर घेणाऱ्यांचं स्वप्न पूर्ण होणार, 2025 वर्षातील खास होम-लोन व्याज दर इथे जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK IRFC Share Price | 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला IRFC शेअर, आता तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Penny Stocks | 6 रुपयाचा पेनी शेअर खरेदीसाठी गर्दी, सुसाट वेगात कमाई, यापूर्वी 776% परतावा दिला - Penny Stocks 2025
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, मालामाल करणार शेअर - NSE: YESBANK

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | गुरुवारच्या तेजीनंतर शुक्रवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. दरम्यान, कॉर्पोरेट कंपन्यांकडून तिमाही निकालापूर्वी आपले बिझनेस अपडेट्स देण्यात येत आहेत. येस बँक लिमिटेडने आपल्या डिपॉझिट ग्रोथबाबत अपडेट दिली आहे.

येस बँक शेअरवर सकारात्मक परिणाम

येस बँक लिमिटेडने कर्ज आणि एफडी वाढ विषयी माहिती दिली आहे. या अपडेट येस बँक शेअरवर सकारात्मक परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी येस बँक शेअर 2.09 टक्क्यांनी वाढून 20 रुपयांवर पोहोचला होता. या तेजीनंतर येस बँके लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप 62,700 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

येस बँके लिमिटेडचा डिपॉझिट ग्रोथ

31 डिसेंबर 2024 रोजी येस बँक लिमिटेडच्या कर्ज आणि ऍडव्हान्स तिमाही-दर-तिमाही आधारावर (क्यूओक्यू) 4.2 टक्क्यांनी वाढून 2,45,035 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे 30 सप्टेंबर 2024 रोजी 2,35,117 कोटी रुपये इतके होते. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षातील याच महिन्याच्या तुलनेत म्हणजे 31 डिसेंबर 2023 रोजी कर्ज 12.6 टक्क्यांनी वाढून 2,17,523 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले होते.

येस बँक लिमिटेडच्या डिपॉझिट्स

तसेच येस बँक लिमिटेडच्या डिपॉझिट्स तिमाही-दर-तिमाही आधारावर 2,77,199 कोटी रुपयांवर स्थिर राहिल्या, जे सप्टेंबर 2024 अखेर 2,77,214 कोटी रुपये होत्या. येस बँक लिमिटेडच्या ठेवी 2,41,831 कोटी रुपयांवरून 14.6 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

येस बँक लिमिटेडचा CASA

येस बँक लिमिटेडच्या CASA (चालू आणि बचत खाते) ठेवी तिमाही-दर-तिमाही 3.4 टक्क्यांनी वाढून 91,575 कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. ज्या सप्टेंबर 2024 मध्ये 88,601 कोटी रुपये इतक्या होत्या. येस बँक लिमिटेडचा CASA 27.6 टक्क्यांनी वाढून 71,749 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील तिमाहीत ३२ टक्के आणि मागील वर्षी याच कालावधीत २९.७ टक्क्यांवरून CASA चे प्रमाण ३३ टक्के होते.

येस बँक लिमिटेडचा क्रेडिट टू डिपॉझिट रेशो

येस बँक लिमिटेडचे क्रेडिट टू डिपॉझिट रेशो (सीडीआर) मागील तिमाहीतील 84.8% वरून 88.4% पर्यंत सुधारले आहे, परंतु 31 डिसेंबर 2023 रोजी 89.9% पेक्षा किंचित कमी राहिले आहे असं आकडेवारी सांगते. तसेच बँकेचा लिक्विडिटी कव्हरेज रेशो 133.2% होता, जो मागील तिमाहीत 132.0% होता आणि मागील वर्षाच्या याच तिमाहीतील 118.4% पेक्षा लक्षणीय अधिक असल्याचे आकडेवारी सांगते.

येस बँक शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात येस बँक शेअरने 1.37% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात येस बँक शेअर 3.93% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 16.34% घसरला आहे. मागील १ वर्षात येस बँक शेअर 12.58% घसरला आहे. मागील ५ वर्षात येस बँक शेअर 57.49% घसरला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 61.84% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर येस बँक शेअरने 1.93% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Yes Bank Share Price Friday 03 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x