7 January 2025 10:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, रेटिंग जाहीर, टार्गेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो, तिकीट बुकिंगवर मिळणार 50% डिस्काउंट, अशा पद्धतीने तिकीट बुकिंग करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गिफ्ट, महागाई भत्ता 55 टक्क्यांवर, पे-ग्रेडप्रमाणे रक्कम जाणून घ्या Home Loan Interest Rates | नवीन घर घेणाऱ्यांचं स्वप्न पूर्ण होणार, 2025 वर्षातील खास होम-लोन व्याज दर इथे जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK
x

IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करतोय, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA

IREDA Share Price

IREDA Share Price | भारतातील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे. केंद्र सरकारने हरित ऊर्जेवर भर दिल्याने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. भारत सरकारने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता साध्य करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. यामुळे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स तेजीत येऊ शकतात. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी शेअरच्या तेजी मागील हेच प्रमुख कारण आहे.

इरेडा शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी इरेडा लिमिटेड कंपनी शेअर 3.29 टक्क्यांनी वाढून 229.78 रुपयांवर पोहोचला होता. इरेडा लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 310 रुपये होती, तर इरेडा लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 100.20 रुपये होती. इरेडा लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 61,765 कोटी रुपये आहे.

इरेडा शेअर टार्गेट प्राईस

* इरेडा शेअर सध्याची प्राईस – 230.30 रुपये
* किती परतावा मिळू शकतो – 28.4%
* इरेडा स्टॉक सपोर्ट लेव्हल – 219 रुपये, 205 रुपये
* इरेडा स्टॉक रेझिस्टन्स लेव्हल – 255 रुपये, 265 रुपये

बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, इरेडा कंपनी शेअर दैनंदिन चार्टवर नव्याने ब्रेकआऊटचे संकेत देत आहे. इरेडा कंपनी शेअरने २१९ रुपयांची लेव्हल ओलांडल्याने ब्रेकआऊटची पुष्टी झाली आहे. तज्ज्ञांच्या मते इरेडा कंपनी शेअर २८५ रुपयांपर्यंत वाढू शकतो. शेअर शेअरला २५५ ते २६५ रुपयांच्या आसपास रेझिस्टन्स दिसत आहे.

इरेडा शेअरने किती परतावा दिला

शुक्रवार, 03 जानेवारी 2025 पासून मागील ५ दिवसात इरेडा कंपनी शेअरने 16.50% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात इरेडा कंपनी शेअरने 11.05% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 2.89% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात इरेडा कंपनी शेअरने 125.49% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 265.74% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर इरेडा कंपनी शेअरने 1.55% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price Friday 03 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(133)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x