7 January 2025 10:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, रेटिंग जाहीर, टार्गेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो, तिकीट बुकिंगवर मिळणार 50% डिस्काउंट, अशा पद्धतीने तिकीट बुकिंग करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गिफ्ट, महागाई भत्ता 55 टक्क्यांवर, पे-ग्रेडप्रमाणे रक्कम जाणून घ्या Home Loan Interest Rates | नवीन घर घेणाऱ्यांचं स्वप्न पूर्ण होणार, 2025 वर्षातील खास होम-लोन व्याज दर इथे जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK
x

SJVN Share Price | एसजेव्हीएन स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, PSU शेअर मालामाल करणार, स्टॉक BUY करावा का - NSE: SJVN

SJVN Share Price

SJVN Share Price | नुकताच एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीने बिहार सरकारसोबत सामंजस्य करार केल्याची घोषणा केल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. हा करार १००० मेगावॅट क्षमतेच्या हाथीदाह दुर्गावती पंप्ड स्टोरेज प्रोजेक्ट (पीएसपी) आणि इतर पीएसपीच्या विकासाशी संबंधित आहे. दरम्यान, एसजेव्हीएन कंपनी शेअर चार्टवर तेजीचे संकेत दिसत आहेत.

एसजेव्हीएन शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी शेअर 0.23 टक्क्यांनी घसरून 109.10 रुपयांवर पोहोचला होता. एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 161.45 रुपये होती, तर एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 88.85 रुपये होती. एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 42,854 कोटी रुपये आहे.

एसजेव्हीएन शेअर टार्गेट प्राईस

* एसजेव्हीएन शेअर सध्याची प्राईस – 109.10 रुपये
* किती परतावा मिळू शकतो – 22.70%
* एसजेव्हीएन स्टॉक सपोर्ट लेव्हल – 104 रुपये
* एसजेव्हीएन स्टॉक रेझिस्टन्स लेव्हल – 114 रुपये, 121 रुपये, 127 रुपये

स्टॉक चार्टवरील संकेत

बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, एसजेव्हीएन शेअर लॉन्ग टर्म चार्टवर गेल्या ३ महिन्यांपासून 20-एमएमए (मंथली मूव्हिंग एव्हरेज) च्या आसपास सपोर्ट टेस्ट घेताना दिसत आहे. 20-एमएमए 104 रुपयांवर आहे आणि ऑगस्ट 2020 पासून एसजेव्हीएन शेअर त्यापेक्षा खाली बंद झालेला नाही. जोपर्यंत हा सपोर्ट टिकून आहे, तोपर्यंत एसजेव्हीएन शेअर नजीकच्या काळात लक्षणीय तेजी दाखवू शकतो. त्यामुळे एसजेव्हीएन शेअर पुन्हा १३५ रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तसेच अंतरिम रेझिस्टन्स ११४ रुपये, १२१ रुपये आणि १२७ रुपयांच्या आसपास राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SJVN Share Price Friday 03 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

SJVN Share price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x