19 April 2025 2:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग दरम्यान येस बँक शेअर फोकसमध्ये आला होता. शुक्रवारी येस बँक 1.79 टक्क्यांनी वाढून 19.94 रुपयांवर बंद झाला होता. शुक्रवारी दिवसभरात येस बँक शेअरने 20.19 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता. आता येस बँक बाबत अजून एक सकारात्मक बातमी आली आहे. येस बँकेने तिसऱ्या तिमाहीचे बिझनेस अपडेट जाहीर केले आहे. या अपडेटनंतर येस बँक शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती.

येस बँक शेअर टार्गेट प्राईस

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी येस बँक शेअरबाबत सकारात्मक तेजीचे संकेत दिले आहेत. येस बँकेच्या ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 कालावधीतील बिझनेस आकडेवारीचा शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे येस बँक शेअर्सबाबत ब्रोकरेज फर्मने देखील तेजीचे संकेत दिले आहेत. चॉइस ब्रोकिंग फर्मचे कार्यकारी संचालक सुमीत बगडिया येस बँके शेअरबाबत म्हणाले की, ‘येस बँके स्टॉक टेक्निकल चार्टवर सकारात्मक दिसत असून लवकरच तो २२ ते २४ रुपयांपर्यंत वाढू शकतो. मात्र, चॉइस ब्रोकिंग फर्मच्या तज्ज्ञांनी येस बँक शेअरसाठी १९ रुपयांवर स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला दिला.

येस बँक आर्थिक वर्ष 2025 च्या तिसऱ्या तिमाहीचे बिझनेस अपडेट

येस बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील बिझनेस अपडेटची माहिती शेअर बाजाराला दिली आहे. त्या आकडेवारीनुसार येस बँकेच्या एकूण ठेवी 14.6 टक्क्यांनी वाढून 2.77 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत हा आकडा 2.41 लाख कोटी रुपये इतका होता.

तसेच येस बँकेची कर्जे आणि ऍडव्हान्स 12.6 टक्क्यांनी वाढून 2.45 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जो मागील तिसऱ्या तिमाहीत 2.17 लाख कोटी रुपये होती. बँकेने दिलेल्या अपडेटनुसार तिमाही विकासदर जवळपास ४.२ टक्क्यांनी वाढून २.४५ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच सीएएसए (चालू खाते बचत खाते) 27.6 टक्क्यांनी वाढून 91,575 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Yes Bank Share Price Saturday 04 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या