8 January 2025 10:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, या फंडात मल्टिबॅगर परतावा मिळेल, 130 टक्क्याने कमाई करा SBI Mutual Fund | बिनधास्त महिना बचत करा SBI फंडाच्या या योजनेत, SIP वर मिळेल 1 कोटी 22 लाख रुपये परतावा EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स Redmi 14C 5G | 10 हजारांचा बजेट असेल तर, Redmi 14C 5G सिरीजवर मिळतेय बंपर सूट, फीचर्सबद्दल जाणून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये तेजीचे संकेत, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Bharat Dynamics Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार स्टॉक, टार्गेट नोट करा - NSE: BDL
x

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या

Post Office Scheme

Post Office Scheme | पोस्टाच्या सर्वच योजना गुंतवणूकदारांच्या मनपसंतीस उतरल्या आहेत. पोस्टाचे मालामाल करून टाकणारे व्याजदर गुंतवणूकदारांना भावतात. त्यामुळेच कमी काळासाठी अगदी छोट्या पैशांतून गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या पोस्टाकडे जास्त प्रमाणात पाहायला मिळते.

अशीच एक शॉर्ट टर्म इन्वेस्ट योजना आहे जिचं नाव पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट असं आहे. पोस्टाची आरडी योजना 5 वर्षांची असते. यामध्ये कोणताही गुंतवणूकदार निश्चितपणे गुंतवणूक करून एक मोठी रक्कम मिळवू शकतो. दरम्यान पोस्टाच्या आरडी योजनेची खासियत म्हणजे ही योजना तुम्हाला पाच वर्षांच्या मॅच्युरिटीवर तुमच्या गुंतवणुकीनुसार आकर्षक व्याजदर प्रदान करते.

जाणून घ्या पोस्टाच्या आरडी योजनेबद्दल :
पोस्टाची आरडी योजना त्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते ज्यांना भविष्यासाठी प्रत्येक महिन्याला आपल्या पगारातील काही रक्कम बचत करायची आहे. पोस्टाच्या आरडीमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवावी लागेल. योजनेचे मुख्य उद्दिष्टे असे आहे की, छोट्यातील छोटा गुंतवणूकदार देखील त्याच्या भविष्यासाठी तेव्हा अडीअडचणीच्या काळासाठी स्वतःच्याच कमाईतील रक्कम जमा करू शकेल.

योजनेचे व्याजदर आणि कार्यकाळ :
पोस्टाच्या आरडी तुम्हाला 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी पैसे गुंतवणुकीची मुभा देते. म्हणजेच तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि वित्तीय गरजांनुसार पैसे गुंतवून मालामाल होऊ शकता. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने पोस्टाच्या आरडीमध्ये 5 वर्षांसाठी गुंतवणूक केली असेल तर, त्याला व्याजदर 6.7% एवढे मिळेल.

गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल जाणून घ्या :
समजा तुम्ही पोस्टाच्या आरडी योजनेत 5 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 5000 रुपयांची रक्कम जमा करत असाल तर, तुमच्या पोस्ट ऑफिस खात्यामध्ये 3 लाखांची रक्कम जमा होईल. तुमच्या गुंतवणुकीचा सातत्य असेल तर, 3 लाखांपेक्षा अधिक रक्कम देखील जमा होऊ शकते.

दिलेल्या व्याजदरानुसार 5 वर्षांत गुंतवणूकदाराच्या खात्यात 3,56,803 रुपये जमा होतील. यामध्ये व्याजदर आणि मिळालेली रक्कम 56,803 रुपये एवढी असेल. म्हणजेच पोस्टाची आरडी तुम्हाला आकर्षक व्याजदर प्रदान करते. ज्यामुळे तुम्हाला केवळ व्याजाने आणि पाच वर्षांच्या प्रतीक्षेचे 50000 हून अधिक पैसे मिळतात.

पोस्ट खात्यात अकाउंट कसं उघडाल :
तुम्हाला देखील पोस्टाच्या आरडी योजनेचा भाग व्हायचं असेल आणि योजनेत पैसे गुंतवून लाखोंची रक्कम कमवायची असेल तर, तुमच्या घराजवळील पोस्ट ऑफिस खात्यात जाऊन पोस्टाच्या आरडी योजनेकरिता लागणाऱ्या फॉर्मसाठी अर्ज करा. फॉर्म संपूर्ण भरून गुंतवणूक सुरू करा. त्याचबरोबर तुम्ही योजनेच्या किती कार्य काळापर्यंत गुंतवणूक करणार आहात या सर्व गोष्टींचे तपशील व्यवस्थित द्या.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme Sunday 05 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(209)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x