8 January 2025 6:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स Redmi 14C 5G | 10 हजारांचा बजेट असेल तर, Redmi 14C 5G सिरीजवर मिळतेय बंपर सूट, फीचर्सबद्दल जाणून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये तेजीचे संकेत, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Bharat Dynamics Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार स्टॉक, टार्गेट नोट करा - NSE: BDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

OnePlus 13 | वनप्लस 13 स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि प्राईस डिटेल्स जाणून घ्या

OnePlus 13

OnePlus 13 | आपल्या भारतात वन प्लस स्मार्टफोन कंपनीने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत वन प्लसचे बरेच मॉडेल विक्री करण्यात आले आहेत. वनप्लसच्या मॉडेल्सचे फीचर्स आणि आणि डिस्प्ले क्वालिटी अत्यंत तगडी असते. त्याचबरोबर वन प्लस मोबाईलमध्ये आपल्याला वेगवेगळे फीचर्स नवीन वर्जनसह पाहायला मिळतात.

अशातच स्मार्टफोन प्रेमींसाठी वन प्लस कंपनी आणखीन एक नवीन मॉडेल घेऊन येत आहे. या मॉडल्सच नाव ‘वन प्लस 13’ असं आहे. 7 जानेवारी 2025 तारखेला वन प्लसची ही सिरीज लॉन्च होणार आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन वन प्लस कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी चीन देशामध्ये वन प्लस 13 या स्मार्टफोनची लाँचिंग करण्यात आली आहे. तेथील युजर्सला हा मोबाईल प्रचंड आवडला आहे.

वन प्लस 13 चे जबरदस्त भारतीय लॉन्चिंग :

येत्या 7 जानेवारीला लॉन्च होणाऱ्या वन प्लस 13 लॉन्चिंगचा कार्यक्रम कंपनीच्या यूट्यूब चैनलमार्फत थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कंपनीच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हाला हे थेट लाईव्ह प्रक्षेपण आता येणार आहे.

वन प्लसच्या प्रीमियम फोनची किंमत :

वन प्लस 13 च्या लॉन्चिंग डेटसह इतरही तपशील लिक करण्यात आले आहेत. लीक झालेल्या माहितीनुसार वन प्लस 13 यस स्मार्टफोनची किंमत 67,000 ते 70,000 रुपयांदरम्यान असणार आहे.

स्मार्टफोनच्या फीचर्सविषयी जाणून घ्या :

या प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनीच्या वन प्लस 13 या मॉडेलला 6.82 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर 120Hz एवढा रिफ्रेश रेट देखील दिला आहे. स्नॅपड्रॅगन तसेच मल्टी टास्किंगसाठी वन प्लसचा हा स्मार्टफोन चर्चिला जाऊ शकतो. दरम्यान यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये ग्राहकांना OIS सपोर्ट देखील मिळणार. पॉवर बॅकअपकरिता स्मार्टफोनची बॅटरी 6000mAh एवढी दिली आहे तर, 100W चा फास्ट चार्जर देखील दिला आहे.

Latest Marathi News | OnePlus 13 Saturday 04 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#OnePlus 13(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x