8 January 2025 11:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: YESBANK Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, या फंडात मल्टिबॅगर परतावा मिळेल, 130 टक्क्याने कमाई करा SBI Mutual Fund | बिनधास्त महिना बचत करा SBI फंडाच्या या योजनेत, SIP वर मिळेल 1 कोटी 22 लाख रुपये परतावा EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स Redmi 14C 5G | 10 हजारांचा बजेट असेल तर, Redmi 14C 5G सिरीजवर मिळतेय बंपर सूट, फीचर्सबद्दल जाणून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये तेजीचे संकेत, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch
x

CIBIL Score | पगारदारांनो, या 5 स्टेप्स फॉलो करा, तुमचा सिबिल स्कोर कधीही खराब होणार नाही, जाणून घ्या फायद्याची बातमी

CIBIL Score

CIBIL Score | नोकरीपेशा असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सिबिल स्कोर 700 ये 900 या आकड्या दरम्यान असणे महत्त्वाचे आहे. कारण की एक उत्तम सिबिल स्कोर तुम्हाला आणि अडचणीच्या काळात किंवा एनीटाईम लोन देण्यास सज्ज असतो.

सिबिल स्कोरमार्फत तुमची रिपेमेंट हिस्ट्री देखील समजली जाते. त्याचबरोबर तुमचा चांगला सिबिल स्कोर तुम्ही किती चांगल्या प्रकारे बँकेचे लोन परतफेड करू शकता हे दर्शवते. ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर अत्यंत कमी असतो त्यांना बँकेकडून लोन मिळण्यास अमंजुरी मिळते. तुम्हाला बँकेकडून कमी दरात लोन मिळणार की तुमच्याकडून जास्तीचे व्याजदर उकळले जाणार हे देखील तुमच्या चांगल्या सिबिल स्कोरवर आधारित असते. तुम्हाला देखील तुमचा सिबिल स्कोर चांगला बनवायचा असेल तर, या 5 गोष्टी फॉलो करा.

1. लोन गॅरेंटर :
तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर खराब करून घ्यायचा नसेल तर, लोन गॅरेंटर बनताना विचारपूर्वक बना. शक्यतो जो व्यक्ती कधीही घेतलेलं कर्ज वेळेवर फेडू शकणार नसेल अशा व्यक्तीचे लोन गॅरेंटर बनने अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही एका विश्वासहार्य व्यक्तीला मदत केली पाहिजे.

2. क्रेडिट कार्डची लिमिट :
बऱ्याच व्यक्तींना क्रेडिट कार्डची लिमिट वारंवार वाढवण्याची गरज भासते. परंतु असं करणं अत्यंत चुकीचं आहे. क्रेडिट कार्डची लिमिट एका लिमिटपर्यंत वाढवा. वारंवार लिमिट वाढवल्यामुळे तुम्ही अति प्रमाणात पैसे खर्च करत आहात ही बाब दिसून येते.

3. क्रेडिट कार्डचा उपयोग :
चांगला सिबिल स्कोर तयार करण्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्डचा वापर देखील अत्यंत सावधानीने करायला हवा. तुम्हाला ज्या लिमिटमध्ये क्रेडिट कार्ड दिले आहे त्याच लिमिटपर्यंत पैसे खर्च करा. तुम्ही लिमिट क्रॉस केली तर तुमच्या सिबिल स्कोरवर याचा थेट परिणाम होताना पाहायला मिळेल. तुम्ही केवळ 30% टक्क्यांपर्यंत क्रेडिट कार्डचा वापर केला पाहिजे.

4. EMI आणि सर्व बिले वेळेवर पेमेंट करा :
आपण बरेचदा काही वस्तू EMI वर देखील खरेदी करतो. अशावेळी तुम्ही तुमचे EMI वेळेवर भरणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर याचा थेट परिणाम तुमच्या सिबिल स्कोरवर पाहायला मिळेल. एवढेच नाही तर, EMI वेळेवर आणि ठरलेल्या तारखेलाच भरावे लागते अन्यथा तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो.

5. अनेक लोन घेणे :
तुम्ही एका वस्तूसाठी कर्ज घेतले असेल तर, ते कर्ज पूर्ण फेडल्यानंतरच दुसरं कर्ज घ्या. एकाच वेळेला अनेक लोन घेतल्यामुळे तुमच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ शकते. या कारणामुळे देखील तुमचा सिबिल स्कोर पूर्णपणे खराब होतं.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | CIBIL Score Sunday 05 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#CIBIL Score(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x