8 January 2025 12:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | ही कंपनी 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स देणार, खरेदीला गर्दी, यापूर्वी 4000% परतावा दिला - NSE: JINDWORLD FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: YESBANK Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, या फंडात मल्टिबॅगर परतावा मिळेल, 130 टक्क्याने कमाई करा SBI Mutual Fund | बिनधास्त महिना बचत करा SBI फंडाच्या या योजनेत, SIP वर मिळेल 1 कोटी 22 लाख रुपये परतावा EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
x

IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA

IREDA Share Price

IREDA Share Price | आठवड्याभरात स्टॉक मार्केट निफ्टी 50 निर्देशांक 0.8 टक्क्यांनी वाढून 24,005 वर पोहोचला होता. तर बीएसई सेन्सेक्स 0.67 टक्क्यांनी वाढून 79,223 वर पोहोचला होता. आठवड्याभरात स्टॉक मार्केट एनएसई निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप 100 निर्देशांकांनी बेंचमार्क निर्देशांकांना मागे टाकत अनुक्रमे 1.67% आणि 1.48% वाढ नोंदवली आहे. शेअर बाजारातील या चढ-उतारात इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरबाबत तज्ज्ञांनी खरेदीचा सल्ला दिला आहे.

इरेडा शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअर 3.16 टक्क्यांनी वाढून 229.50 रुपयांवर पोहोचला होता. इरेडा लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 310 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 100.20 रुपये आहे. इरेडा लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 61,966 कोटी रुपये आहे.

इरेडा कंपनीकडून अपडेट

इरेडा कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती देताना म्हटले आहे की, ‘इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक ९ जानेवारीला आयोजित करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीतील कंपनीच्या लेखापरीक्षण केलेल्या आर्थिक निकालांचा विचार करून त्याला मंजुरी देण्यात येणार आहे अशी माहिती फायलिंगमध्ये दिली आहे.

इरेडा शेअर टार्गेट प्राईस

बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, इरेडा लिमिटेड कंपनी शेअर चार्टवर ब्रेकआऊटचे संकेत दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते, इरेडा शेअरला 219 रुपयांच्या लेव्हल वर सपोर्ट आहे आणि रेझिस्टन्स लेव्हल 255 रुपयांवर आहे. तज्ज्ञांच्या मते इरेडा कंपनी शेअर २८५ रुपयांपर्यंत वाढू शकतो. म्हणजे गुंतवणूकदारांना सध्याच्या पातळीवरून 28.4% परतावा मिळू शकतो.

इरेडा शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात इरेडा कंपनी शेअरने 16.47% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात इरेडा शेअरने 3.91% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 0.29% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात इरेडा शेअरने 118.36% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 265.74% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर इरेडा कंपनी शेअरने 1.55% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price Saturday 04 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(133)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x