8 January 2025 10:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | 5 लाखांची रक्कम गुंतवून 15 लाख कमवायचे आहेत, पोस्टाची 'ही' योजना करेल मदत, वाचा सविस्तर माहिती Railway Ticket Booking | रेल्वे तिकिट सोबत 'या' मोफत सुविधांचा लाभ तुम्ही घेताय ना, 99% प्रवाशांना माहित नाही Salary Account | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात अनेक फायदे, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: INFY Penny Stocks | 90 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, तुफान खरेदी, शेअरने अप्पर सर्किट हिट केला - Penny Stocks 2025 IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांचा अलर्ट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा - NSE: TATAPOWER

Tata Power Share Price

Tata Power Share Price | सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. जवळपास सर्वच क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. सोमवारी दुपारी 1 वाजून 37 मिनिटांनी बीएसई सेन्सेक्स 1.42% म्हणजेच 1121.46 अंकांनी घसरून 78,101.65 वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टी 1.42% म्हणजेच 341.15 अंकांनी घसरून 23,663.60 अंकांवर पोहोचला होता.

टाटा पॉवर कंपनी शेअरची सध्याची स्थिती

सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 4.70 टक्क्यांनी घसरून 378 रुपयांवर पोहोचला होता. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 494.85 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 326.80 रुपये होता. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,21,039 कोटी रुपये आहे.

टाटा पॉवर शेअर प्राईस टार्गेट प्राईस

ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट एक्सपर्ट राजेश यांनी टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. मार्केट एक्सपर्ट राजेश यांनी टाटा पॉवर कंपनी शेअरबाबत गुंतवणूक रणनीती सांगितली आहे.

स्टॉक मार्केट विश्लेषक राजेश यांनी म्हटले की, टाटा पॉवर शेअरने ४०० रुपयांची मुख्य लेव्हल मोडली असून आता शॉर्ट टर्ममध्ये हा शेअर अजून घसरण्याची शक्यता आहे. टाटा पॉवर कंपनी शेअर 365 रुपयांच्या पातळीपर्यंत घसरू शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

टाटा पॉवर शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात टाटा पॉवर कंपनी शेअर 2.96% घसरला आहे. मागील १ महिन्यात टाटा पॉवर कंपनी शेअर 14.03% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 12.79% घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा पॉवर शेअरने 11.52% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात टाटा पॉवर कंपनी शेअरने 541.22% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने 3,605.88% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर टाटा पॉवर कंपनी शेअर 3.67% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Power Share Price Monday 06 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(147)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x