9 January 2025 10:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025 Bank Account Alert | 'या' बँक FD वर देतात घसघशीत परतावा; 9 टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज, पैशाने पैसा वाढवा Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER
x

EPF Withdrawal | पगारदारांनो, या कारणांचा वापर करून EPF खात्यातून पैसे काढू शकता, 90 लोकांना माहित नाही

EPF Withdrawal

EPF Withdrawal| नोकरीपेक्षा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं खास करून खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांचं ईपीएफओमध्ये पीएफ खाते असतेच. ज्यामध्ये पगारातील 12% रक्कम स्वतः कर्मचारी तर, नोकरदारा एवढीच रक्कम नियोक्ता देखील गुंतवतो. दोघांच्या योगदानामुळे रिटायरमेंट फंड जमा होण्यास मदत होते.

यामधीलच काही रक्कम तुमच्या भविष्यातील पेन्शनसाठी देखील जमा केली जाते. बऱ्याचदा व्यक्तीला काही आर्थिक अडचणींसाठी किंवा काही महत्त्वाच्या कारणांसाठी जास्त पैशांची गरज असते. अशावेळी पीएफ खात्यातील पैसे लवकरात लवकर काढता यावे यासाठी नोकरदार व्यक्ती प्रयत्न करतो. आज आम्ही तुम्हाला या लेखातून कर्मचारी नेमक्या कोणकोणत्या कारणांसाठी पीएफ खात्यातील पैसे काढू शकतो आणि पैसे काढण्याची नेमकी प्रोसेस काय याबद्दल माहिती सांगणार आहोत.

केव्हा काढता येईल आंशिक रक्कम :

1. घर खरेदी करण्यासाठी तुम्ही पीएफ खात्यातील पैसे काढू शकता.
2. स्वतःच्या किंवा मुलाच्या लग्न खर्चासाठी तुम्हाला पीएफ खात्यातील आंशिक रक्कम काढता येईल.
3. तुम्ही तुमचे घर नूतनीकरणासाठी काढले असेल तर, तुम्ही PF खात्यातील पैसे काढण्यास पात्र आहात.
4. बऱ्याचदा काही आपात्कालीन परिस्थितीत आपल्याजवळ पुरेसे पैसे नसतात. त्यावेळी पीएफ खात्यातील पैसे तुमची मदत करतील.
5. गृह कर्जाची परतफेड करण्यासाठी देखील तुम्ही पीएफ खात्यातील पैशांची मदत घेऊ शकता.
6. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, पीएफ खात्यातील पैसे काढण्यासाठी तुम्हाला किमान 5 ते 7 वर्षे ईपीएफओ सदस्य बनवून राहावं लागेल.

आंशिक प्रमाणात पैसे काढण्याची प्रक्रिया काय आहे जाणून घ्या :

1. सर्वप्रथम तुम्हाला युएएनच्या अधिकृत पोर्टल वर जावं लागेल आणि स्वतःचा युएएन नंबर आणि पासवर्ड टाकून पेज ओपन करावं लागेल.

2. दुसऱ्या प्रोसेसमध्ये आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला एक ओटीपी पाठवण्यात येईल. हा ओटीपी त्याचबरोबर कॅपच्या कोड टाकून पुढील पेज ओपन करावं लागेल.

3. आता तुमच्यासमोर एक प्रकारचे वेबपेज ओपन होईल. या पेजच्या वरील बाजूस तुम्हाला ‘ऑनलाइन सर्विसेस’ नावाचे ऑप्शन पाहायला मिळेल. त्यानंतर डाऊन साईडला गेल्यानंतर तुम्हाला ‘क्लेम’ नावाचा देखील ऑप्शन पाहायला मिळेल. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

4. तुमचे जे बँक खाते ईपीएफ खात्याशी लिंक आहे त्या बँकेचा नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. असं केल्याने सदस्याची पडताळणी व्यवस्थितपणे केली जाते.

5. तुम्ही दावा गेलेली रक्कम ईपीएफओकडून थेट तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाईल. त्यानंतर नियम आणि अटी समोर येतील या ऑप्शनवर देखील क्लिक करायचं आहे.

6. पुढील प्रोसेसमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने क्लेम करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स फील करून घ्यायचे आहेत.

7. पुढील प्रोसेसमध्ये तुम्हाला 15जी फॉर्म, त्याचबरोबर तुम्ही राहत असणारा पत्ता यांसारखेही महत्त्वाची कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी द्यावी लागतील. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने क्लेम करण्यासाठी पुरेपूर पात्र असाल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPF Withdrawal Tuesday 07 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPF Withdrawal(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x