9 January 2025 9:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | 5 लाखांची रक्कम गुंतवून 15 लाख कमवायचे आहेत, पोस्टाची 'ही' योजना करेल मदत, वाचा सविस्तर माहिती Railway Ticket Booking | रेल्वे तिकिट सोबत 'या' मोफत सुविधांचा लाभ तुम्ही घेताय ना, 99% प्रवाशांना माहित नाही Salary Account | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात अनेक फायदे, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: INFY Penny Stocks | 90 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, तुफान खरेदी, शेअरने अप्पर सर्किट हिट केला - Penny Stocks 2025 IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

Post Office Scheme | पोस्टाची सर्वोत्तम योजना, व्याजाने कमवाल 2 लाख रुपये, लोन सुविधा देखील होईल प्राप्त, फायदा घ्या

Post Office Scheme

Post Office Scheme | पोस्ट ऑफिस अंतर्गत विविध योजना सुरू आहेत. यामधील बऱ्याच योजना स्मॉल सेविंग स्कीम्स आहेत. स्मॉल सेविंग म्हणजेच कमी काळाच्या गुंतवणुकीसाठी चालवली जाणारी योजना. स्मॉल सेविंग योजनांमध्ये पैसे गुंतवून तुम्ही लाखांच्या घरात पैसे मिळवू शकता. यामध्ये तुम्ही चक्क 5000 रुपये गुंतवून 8 लाखांचा फंड तयार करू शकता. आज या बातमीच्या माध्यमातून आपण संपूर्ण गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन जाणून घेणार आहोत.

व्याजाच्या पैशांतून व्हाल लखपती :

1. पोस्टाची एक जबरदस्त स्मॉल सेविंग योजना आहे. जिचं नाव ‘पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट’ म्हणजेच पोस्ट ऑफिस आरडी. आतापर्यंत बऱ्याच गुंतवणूकदारांनी पोस्टाच्या आरडीमध्ये पैसे गुंतवून लाखोंची कमाई केली आहे.

2. पोस्टाच्या आरडी योजनेवर तुम्हाला 6.7% व्याजदर मिळते. जे तिमाही आधारावर कॅल्क्युलेट केले जाते. गुंतवणूकदाराला मिळणारा इंटरेस्ट रेट अतिशय उत्तम असल्याने लवकरात लवकर श्रीमंतीच्या मार्गावर पोहोचण्यास सोपे जाते.

3. तुम्हाला देखील पोस्टाच्या आरडी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तुम्ही तुमच्या घराजवळील पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन स्वतःच्या नावाने खातं उघडू शकता.

4. दरम्यान पोस्टाची आरडी योजना इतकी जबरदस्त आहे की, तुम्ही यामध्ये केवळ 100 रुपयांपासून सुरुवात करू शकता.

5. पोस्टाच्या आरडी योजनेचा मॅच्युरिटी पिरियड केवळ पाच वर्षांसाठीच असतो. पाच वर्षांत तुम्ही भरपूर गुंतवणूक करून प्रचंड पैसे मिळवू शकता.

6. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पोस्टाच्या योजनेमध्ये कर्ज घेण्याची सुविधा देखील मिळते. परंतु यासाठी तुम्हाला गुंतवणुकीचे पहिले वर्ष पूर्ण करावे लागेल. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जमा रक्कमेच्या एकूण 50% कर्ज काढून घेऊ शकता.

पोस्टाच्या आरडी योजनेतून केवळ व्याजानेच 2 लाखांची रक्कम कशी तयार करू शकता :

पोस्टाच्या आरडीमध्ये 8 लाखांचा फंड तयार करण्यासाठी तुम्हाला 5000 रुपये प्रत्येक महिन्याला गुंतवावे. तुम्ही एकूण 5 वर्ष गुंतवणुक केली तर, तुमच्या खात्यात गुंतवणुकीचे 3 लाख रुपये जमा होतील. पोस्ट ऑफिस आरडीच्या व्याजदराप्रमाणे म्हणजेच 6.7% ने तुम्ही 3,56,830 रुपयांचा फंड तयार करू शकाल. यामधील केवळ व्याजांने मिळालेली रक्कम 56,830 एवढी असेल.

8 लाखांचा फंड तयार करण्यासाठी तुम्हाला पोस्टाची आरडी योजना आणखीन पाच वर्षांसाठी एक्सटेंड करून घ्यावी लागेल. 5000 हजारांच्या हिशोबाने एकूण 10 वर्षांत तुम्ही 6 लाख रुपयांची रक्कम जमा करू शकता. 6.7% ने तुम्ही 10 वर्षांत 8,54,272 रुपयांचा मोठा कॉर्पस तयार करू शकता. याचाच अर्थ केवळ व्याजदर आणि कमावलेली रक्कम 2,54,272 रुपये असेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme Tuesday 07 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(210)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x