9 January 2025 5:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर 60 रुपयांच्या खाली घसरला, मल्टिबॅगर शेअर अजून किती घसरणार - NSE: SUZLON IREDA Share Price | शेअर प्राईस 32 रुपयांवरून 214 रुपयांवर पोहोचली, आता शेअर पुन्हा फोकसमध्ये आला - NSE: IREDA EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
x

FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल

FASTag Alert

FASTag Alert | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका कॅबिनेट बैठकीत चार चाकी वाहन चालकांसाठीचा एक मोठा निर्णय पार पाडण्यात आला आहे. या निर्णयाची संपूर्ण माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. हा नवा नियम चालकांना त्यांचे खिसे रिकामे करण्यास भाग पाडू शकतो त्यामुळे सर्वप्रथम संपूर्ण बातमी वाचा आणि माहिती घ्या.

काय आहे नवा नियम :

4 चाकी वाहन चालवणाऱ्या व्यक्तींसाठी महत्त्वाची अपडेट आहे. यामध्ये चालकांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी टोल नाक्यावरून जात असताना कर भरण्यासाठी या गोष्टीचा उपयोग होतो. हा निर्णय यापूर्वी देखील घेण्यात आला होता परंतु याची ठोस अंमलबजावणी केली गेली नव्हती. सरकारने 1 एप्रिल 2025 पासून हा निर्णय अनिवार्य म्हणजेच बंधनकारक केला आहे. प्रत्येक व्यक्तीला या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

निर्णय घेण्याचे कारण :

1. कॅबिनेट मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2025 या दिवसापासून करण्यात येणार आहे.

2. सध्या वाहतूक कोंडीमुळे प्रचंड प्रमाणात नागरिकांचे हाल होताना पाहायला मिळतात. त्यामुळे हा निर्णय घेतल्यानंतर वाहतूक कोंडी होण्यापासून वाचेल त्याचबरोबर वेळेची बचत आणि इंधनाचे पैसे देखील वाचतील.

3. फास्टॅग अनिवार्य केल्यानंतर ज्या वाहन चालकाकडे फास्टॅग कार्यरत नसेल त्या चालकाला पथकर शुल्कापेक्षा जास्त अमाऊंट भरावी लागू शकते.

4. तुमच्याकडे मागितलेले अतिरिक्त शुल्क तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इतर कोणत्याही माध्यमातून करत असाल तरी सुद्धा तुमच्याकडून जास्तीचे पैसे उकळण्यात येऊ शकतात. हे कर तुम्हाला भरावेच लागतील.

5. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला माहितीनुसार बांधकाम विभाग राज्यात एकूण 23 टोलनाके आहेत. त्याचबरोबर 50 टोलनाके एमएसआरडीसीच्या निगराणी खाली आहे. लवकरच या टोल नाक्यांवर एप्रिल महिन्यापासून अंमलबजावणी केली जाईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | FASTag Alert Wednesday 08 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x