9 January 2025 5:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर 60 रुपयांच्या खाली घसरला, मल्टिबॅगर शेअर अजून किती घसरणार - NSE: SUZLON IREDA Share Price | शेअर प्राईस 32 रुपयांवरून 214 रुपयांवर पोहोचली, आता शेअर पुन्हा फोकसमध्ये आला - NSE: IREDA EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH Quant Mutual Fund | जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, SIP वर मिळेल 49 लाख 16,920 रुपये परतावा Penny Stocks | 2 रुपये 30 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, फायदा घ्या, फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील - Penny Stocks 2025
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील अनेक दिवसांपासून सुझलॉन शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील ५ दिवसात हा शेअर 6.89 टक्क्यांनी घसरला आहे. २०२४ मधील तेजीनंतर सुझलॉन शेअर्स नवीन वर्षात किती घसरणार याची चिंता गुंतवणूकदारांना सतावते आहे.

सुझलॉन एनर्जी स्टॉक्सची स्थिती

सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर त्याच्या 5-दिवस, 10-दिवस, 20-दिवस, 30-दिवस, 50-दिवस, 100-दिवस, 150-दिवस आणि 200-दिवसांच्या मूव्हिंग सरासरीच्या खाली ट्रेड करतोय. हा ट्रेंड शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म मंदीचे संकेत देत आहे. सुझलॉन एनर्जीचा शेअर त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावरून 31 टक्क्यांनी घसरला आहे. १४ मार्च २०२४ रोजी सुझलॉन एनर्जी शेअरचा ५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तर ३५.४९ रुपये होता.

चॉइस ब्रोकिंग फर्म – सुझलॉन शेअर टार्गेट प्राईस

चॉइस ब्रोकिंग फर्मचे स्टॉक मार्केट विश्लेषक हार्दिक मटालिया म्हणाले की, ‘सुझलॉन एनर्जी शेअर सध्या 59 रुपयांच्या जवळपास ट्रेड करतोय. चॉइस ब्रोकिंग फर्मच्या म्हणण्यानुसार, जर सुझलॉन एनर्जी शेअर 66 रुपयांच्या पातळीच्या वर टिकून राहण्यात यशस्वी झाली तर शेअरमध्ये सकारात्मक तेजी पाहायला मिळू शकते.

तोपर्यंत गुंतवणूकदारांनी ‘वेट अँड वॉच’ करावं

मजबूत व्हॉल्यूम कन्फर्मेशनसह या रेझिस्टन्स क्षेत्राच्या वरील ब्रेकआउट सुझलॉन शेअरला तेजी देऊ शकतो. तोपर्यंत गुंतवणूकदारांनी ‘वेट अँड वॉच’ करावं. गुंतवणुकदारांनी ५४ रुपयांवर कडक स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे. जे सुझलॉन शेअर खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांनी सुझलॉन एनर्जी शेअरसाठी 66 रुपयांच्या वरील पातळीवर ब्रेकआऊटची प्रतीक्षा करावी.

दुसरीकडे, सेबीचे नोंदणीकृत शेअर बाजार विश्लेषक ए. आर. रामचंद्रन सुझलॉन शेअरबाबत म्हणाले की, ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मंदीचे संकेत असून दैनंदिन चार्टवर शेअरला ६२.२ वर मजबूत रेझिस्टन्स आहे. नजीकच्या काळात सुझलॉन एनर्जी शेअर ५९.५ रुपयांच्या खाली घसरल्यास पुढे तो ५३.४ रुपयेपर्यंत घसरू शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Wednesday 08 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(290)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x