10 January 2025 10:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale 2025 | नव्या वर्षाच्या फ्लिपकार्ट सेलची तारीख जाहीर; लॅपटॉप, स्मार्टफोन आणि नवनवीन वस्तूंवर मिळणार बंपर डिस्काउंट Smart Investment | नुकतेच नोकरीला लागला असाल तर करा हे एक काम; कोटींच्या घरात पैसे कमवाल, जाणून घ्या सविस्तर माहिती Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय EPFO Passbook | नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; तुमच्या UAN संबंधित अपडेट जाणून घ्या, अन्यथा नुकसान होईल Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या 6 योजना वाढवतील पैशाने पैसा, मजबूत गॅरेंटेड परतावा सुद्धा मिळेल BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025
x

Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश

Itel Zeno 10

Itel Zeno 10 | बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या इंटेल कंपनीने आपला इंटेल Zeno 10 हा नवा स्मार्टफोन नुकताच लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचे जबरदस्त लॉन्चिंग झाले असून कमी पैशांत म्हणजेच बजेटमध्ये मोबाईल खरेदी करणाऱ्या व्यक्तींसाठी फारच उत्तम गोष्ट झाली आहे.

या स्मार्टफोनची किंमत अतिशय कमी असून फीचर्स मात्र कमालीचे आहेत. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या बजेटनुसार स्मार्टफोन खरेदी करता यावा यासाठी कंपनीने अगदी कमीत कमी दरात इंटेल Zeno 10 हा स्मार्टफोन भारतीय नागरिकांसाठी लॉन्च केला आहे.

काय आहे इंटेल Zeno 10 ची किंमत :

इंटेल Zeno 10 या स्मार्टफोनच्या किंमतविषयी सांगायचे झाले तर, अगदी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी या स्मार्टफोनची किंमत आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे एकूण 2 प्रकारचे व्हेरिएंटल लॉन्च केले आहेत. दोन्हीही व्हेरिएंटाची किंमत अतिशय सामान्य आहे.

तुम्हाला इंटेल Zeno 10 या स्मार्टफोनच्या पहिल्या वेरियंटची किंमत केवळ 5999 रुपयांना पडणार आहे. 5999 रुपयांमध्ये खरेदी करता येणाऱ्या या स्मार्टफोन बेस मॉडेल 3 GB RAM तसेच 64GB स्टोरेजसह येतो. त्याचबरोबर दुसरा व्हेरिएंट 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसह येतो. या दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत देखील अत्यंत कमी आहे. तुम्हाला हा स्मार्टफोन केवळ 6,499 रुपयांना खरेदी करता येणार आहे. सध्याच्या घडीला इंटेल Zeno 10 या स्मार्टफोनची विक्री ॲमेझॉन ई-कॉमर्स साईटवर सुरू आहे.

स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशनविषयी जाणून घ्या :

नुकतेच लॉन्च झालेले कंपनीचे नवीन मॉडेल 6.66 इंच लांबीच्या डिस्प्लेबरोबर येतो. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz इतका आहे. मोबाईल स्क्रीनवर एक विशिष्ट प्रकारची डायनामिक बार फीचर्स स्क्रीन बसवली आहे. या बारमध्ये तुम्हाला समोरून आलेले नोटिफिकेशन पटकन दिसतील. स्मार्टफोनमध्ये Unisoc T603  प्रोसेसर देखील उपलब्ध आहे.

त्याचबरोबर फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. ज्याची क्लिअरिटी अतिशय जबरदस्त आहे. स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 80MP चा मुख्य कॅमेरा देखील बसवला आहे. त्याचबरोबर 5MP चा मुख्य कॅमेरा देखील दिला आहे. पॉवर बॅकअपकरिता स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 10W चार्जरसह सुसज्ज आहे.

Latest Marathi News | Itel Zeno 10 Thursday 09 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Itel Zeno 10(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x