10 January 2025 7:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर उच्चांकी पातळीवरून 18 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून स्टॉकबाबत महत्वाचे संकेत - NSE: VEDL
x

Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय

Quant ELSS Tax Saver Fund

Quant ELSS Tax Saver Fund | भारतात शेअर बाजारात सध्या घसरण होताना दिसत आहे. दीर्घ काळापासून सुरू असलेल्या या घसरणीचा चांगलाच फटका गुंतवणूकदारांना बसला आहे. या सगळ्यांमध्ये काही असेही म्युच्युअल फंड आहेत ज्याने गुंतवणूकदारांना कोटींच्या घरात परतावा मिळवून दिला आहे. आज आम्ही तुम्हाला एकूण 3 अशा फंडांविषयी माहिती सांगणार आहोत त्यांनी 25 वर्षांच्या आणि 10,000 रुपयांच्या SIP तुन गुंतवणूकदारांना 3 कोटींहून अधिक रिटर्न्स दिले आहेत.

क्वांट ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड  – Quant ELSS Tax Saver Fund

2000 साली एप्रिल महिन्यात सुरू झालेला हा फंड गुंतवणूकदारांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. एकीकडे बाजारात घसरण होत असताना या फंडाने गुंतवणूकदारांना 15.41% रिटर्न मिळवून दिले आहेत. फंडाच्या सुरुवातीपासून तुम्ही यामध्ये दहा हजार रुपयांचे गुंतवणूक सुरू केली असती तर, ही रक्कम 28.80 लाख रुपये झाली असती. त्याचबरोबर तुमच्या फंडाचे एकूण मूल्य 3.03 कोटी रुपये झाले असते.

इएलएसएस म्हणजे नेमकं काय :

ही एक इक्विटी फंड योजना आहे. जी 3 वर्षांच्या लॉक इन पिरियडसह येते. या फंडांना टॅक्स सेवा फंड असं देखील म्हणण्यात येतं. याचं एकमेव कारण म्हणजे तुम्ही या फंडांतर्गत इन्कम टॅक्स कलम 80C अंतर्गत 1.5 लाख इतके रुपये कर सूट मिळवू शकता.

डीएसपी ईएलएसएस टॅक्स सेवर फंड – DSP ELSS Tax Saver Fund

एकीकडे बाजारात होणाऱ्या घसरणीपेक्षा या फंडांनी देखील गुंतवणूकदारांना आतापर्यंत भरपूर पैसे मिळवून दिले आहेत. या फंडाची सुरुवात 2007 सालापासून सुरू झाली होती. 2007 सालापासून ते आत्तापर्यंत या फंडाणे 15.53 टक्के परतावा मिळवून दिला आहे. समजा 2007 साली एखाद्या व्यक्तीने या फंडात दहा हजार रुपयांची गुंतवणूक सुरू केली असती तर, आता गुंतवलेली रक्कम 21.60 लाख रुपये झाली असती. म्हणजेच एसआयपी गुंतवणुकीचे मूल्य 1.80 कोटी रुपये झाले असते.

महत्वाचं :

एसआयपी गुंतवणुकीसाठी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला नक्की घ्यावा. कोणत्याही फसव्या गुंतवणुकीपेक्षा तुम्ही SIP म्युच्युअल फंडांच्या आधाराने पैसे वाढवण्याचा विचार करावा. बाजारात अशा बऱ्याच योजना आहेत परंतु तुम्ही नवीनच गुंतवणूक करणार असाल तर मात्र आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Quant ELSS Tax Saver Fund Friday 10 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Quant ELSS Tax Saver Fund(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x