10 January 2025 8:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER
x

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी नकारात्मक जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये घसरण दिसून येत आहे. विशेष म्हणजे आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आल्यानंतर देखील शेअर बाजारात घसरण दिसून आली होती. गुरुवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसरल्याचं पाहायला मिळालं होत. या घसरणीत टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी तेजीचे संकेत दिले आहेत.

टाटा टेक्नॉलॉजीज शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी टाटा टेक्नॉलॉजीज शेअर 3.94 टक्क्यांनी घसरून 839.85 रुपयांवर पोहोचला होता. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 1,202 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 828.30 रुपये होती. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 34,105 कोटी रुपये आहे.

तज्ज्ञांचा सल्ला आणि टाटा टेक्नॉलॉजीज शेअर टार्गेट प्राईस

स्टॉक मार्केट तज्ज्ञ शर्मिला जोशी यांनी टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. शर्मिला जोशी म्हणाल्या की, टाटा टेक्नॉलॉजीज शेअरने स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध होताच मोठा परतावा दिला होता. मात्र मागील वर्षभरात शेअरने विशेष कामगिरी केलेली नाही. मात्र, टाटा टेक्नॉलॉजीज शेअर पुढील काळात सकारात्मक परतावा देऊ शकतो. मात्र टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये सध्या जो दबाव दिसून येत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे गेल्या दोन तिमाहीच्या निकालात इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) विक्रीत संथ गती दिसून आली आहे. मात्र इलेक्ट्रिक वाहनांच्या संबंधित ज्या प्रकारचा डेटा येत आहे, त्यामुळे भविष्यात विक्रीत मोठी वाढू अपेक्षित आहे, अशी अपेक्षा शर्मिला जोशी यांनी व्यक्त केली आहे.

शर्मिला जोशी पुढे म्हणाल्या की, भविष्यात जास्तीत जास्त लोकांना ईव्ही परवडतील, त्याचा थेट फायदा टाटा टेक्नॉलॉजीज सारख्या ईव्ही क्षेत्रात चांगले सोल्यूशन्स देणाऱ्या कंपन्यांना होईल. त्यामुळे पुढील काळात टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअरमध्ये तेजी दिसू शकते. शर्मिला जोशी यांच्या मते टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअर १२०० रुपयांची टार्गेट प्राईस गाठू शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Technologies Share Price Friday 10 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(56)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x