11 January 2025 10:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा
x

Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD

Bonus Share News

Bonus Share News | वस्त्रोद्योग क्षेत्रातील जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 4 बोनस शेअर्स देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे कंपनीने अजून रेकॉर्ड तारीख जाहीर केली नसल्याने नवीन गुंतवणूंकदारांना सुद्धा मोठी संधी मिळणार आहे.

1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळतील

जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड कंपनीने 1 रुपये फेस वॅल्यूच्या प्रत्येक शेअरसाठी 4 फ्री बोनस शेअर्स देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया 6 मार्च 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड कंपनीने म्हटले आहे. जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड कंपनीने अद्याप रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही. म्हणजे कंपनी जी रेकॉर्ड तारीख जाहीर करेल, त्या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात या कंपनीचे शेअर्स असतील, त्यांच्या डिमॅट खात्यात प्रति शेअर 4 फ्री बोनस शेअर्स जमा होतील.

कंपनी शेअर्सची सध्याची स्थिती कशी आहे?

शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी जिंदाल वर्ल्डवाइड कंपनी शेअर 3.50 टक्क्यांनी घसरून 421 रुपयांवर पोहोचला होता. मागील ५ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 573.06% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने गुंतवणूकदारांना 1,526.74% परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात जिंदाल वर्ल्डवाइड कंपनी शेअरने पोझिशनल गुंतवणूकदारांना 37.99 टक्के परतावा दिला आहे. जिंदाल वर्ल्डवाइड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 471.20 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 267.75 रुपये होता. सध्या या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 8,409 कोटी रुपये आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे?

दुसऱ्या तिमाहीत जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड कंपनीचा एकूण महसूल ४१.८३ टक्क्यांनी वाढून ५६७.५९ कोटी रुपयांवर पोहोचला होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत जिंदाल वर्ल्डवाइड कंपनीचे उत्पन्न ४००.२० कोटी रुपये होते. तसेच दुसऱ्या तिमाहीत जिंदाल वर्ल्डवाइड कंपनीचा निव्वळ नफा १७.४७ कोटी रुपये होता. जो मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ४३.४१ टक्क्यांनी अधिक होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bonus Share News on Jindal Worldwide Share Price Saturday 11 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Bonus Share News(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x