BLOG - अच्छे दिन'च्या प्रतीक्षेत
मुंबई : एकूणच २०१४ मधील लोकसभा निवडणुका असो कि राज्यभर झालेल्या विधानसभा निवडणुका “नरेंद्र मोदी” या शब्दाला साथ लाभली होती ती काही घोष वाक्यांची. त्यातील काही घोषवाक्य आजही मतदारांच्या चांगली लक्ष्यात आहेत उदाहरणार्थ ‘अच्छे दिन आने वाले है’ आणि ‘अब कि बार मोदी सरकार’ आणि या घोषणांनी भुललेल्या आणि काँग्रेस आणि यू.पी.ए च्या भ्रष्ट कारभाराला कंटाळलेल्या मतदारांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता, मोठया अपेक्षेने मोदींवर विश्वास ठेऊन भरगोस मतदान करून बहुमताने निवडून आणलं. अपेक्षा एकच होती आणि ती म्हणजे भाजप आणि अप्रत्यक्ष मोदी खरोखरच जनतेचे “अच्छे” दिन आणतील.
एकूणच २०१४ ते २०१८ पर्यंत अनेक घटना जनतेने अनुभवल्या आणि त्याचं मोठ्या प्रमाणात समर्थनही केलं. मोदी सरकारने घेतलेल्या एकूणच निर्णयातून कालांतराने अनेक परिणाम समोर येऊ लागले त्यातील काही दूरगामी परिणाम करणारे ठरले तर काही निर्णयातून नक्की काय सध्या होतंय तेच मतदाराला उमगत न्हवतं. नोटबंदी सारखा धाडसी निर्णय ज्याचं सुरवातीला काही प्रमाणात समर्थनही झालं. परंतु कालांतराने त्यातले खरे आकडे समोर येऊ लागले, तेही अधिकृत संस्थांकडून आणि अनुभवी अर्थ तज्ज्ञांकडून आणि नोटबंदी पूर्ती फसली होती हे बाहेर येऊ लागलं. ‘मेक इन इंडिया’ या योजनेत किती देशांतर्गत उद्योगांनी ‘मेक इन इंडिया’ योजनेत सहभाग घेतला आणि इतर देशातील किती कंपन्यांनी ‘मेक इन इंडिया’ योजने अंतर्गत भारतात उद्योगांची उभारणी केली ज्या मधून खूप रोजगाराची निर्मिती झाली हा निव्वळ संशोधनाचा विषय ठरला आहे.
मोदी सरकार तरुणांना मोठया रोजगार निर्मितीची किती हि दिवास्वप्न दाखवत असली तरी मोठ-मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योगांनी तंत्रज्ञानातील “ऑटोमेशन” वर केलेली भली मोठी गुंतवणूक पाहता, भविष्यात नवीन रोजगार तर सोडाच उलट उपलब्ध असलेले रोजगारही मोठया प्रमाणावर घटतील हि वस्तू स्थिती आहे आणि त्याचा मोठया प्रमाणात प्रत्ययही येत आहे. त्यातच लघु-उद्योजकही नोटबंदी आणि त्यानंतर आलेल्या जी.एस.टी मुळे पुरता गोंधळलेल्या अवस्तेत आहे. घटत चाललेल्या रोजगारामुळे तरुणांमध्ये सुद्धा मोदी सरकार बदल चिढ वाढत चालली आहे आणि ते प्रखर्षाने जाणवत आहे.
सामान्य माणसासाठी तर दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जीवनाश्यक वस्तूंचे भावही एकदम गगनाला भिडले असून, सामान्य माणसाचं वाढत्या महागाईने पुरतं कंबरडं मोडलं आहे. पेट्रोल, डिझेल, भाजीपाला असो किंव्हा दैनंदिन करावा लागणारा महागडा प्रवास असो सगळंच अगदी डोईजड होऊन गेला आहे, जे मोदींवरील अविश्वास वाढवणार ठरत आहे.
एकूणच गेल्या ३-४ वर्षातील मोदी सरकारचा कारभार पाहता समाजातील प्रत्येक घटक म्हणजे उद्योजक, शेतकरी, कुशल व अकुशल कामगार वर्ग, तरुण – तरुणी आणि अगदी घराचा दैनंदिन गाडा हाकणारी प्रत्येक सामान्य घरातील गृहिणी असो, सगळेच मोदी सरकारच्या या ३-४ वर्षातील कारभाराने पुरते गोंधळलेले दिसत आहेत.
मोदी सरकारच्या ३-४ वर्षातील कारभाराचा जनमाणसातून कानोसा घेतल्यास असे जाणवते कि ज्या सामान्य मतदाराने भाजपला मोठ्या अपेक्षेने भरगोस मतदान करून “अच्छे दिन” दाखवले तोच २०१९ ला त्यांचे “बुरे दिन” पुन्हा परत करू शकतो. कारण कोणत्याही पक्षाने कितीही रणनीती आखली तरी लोकशाहीत मतदाराला गृहीत धरणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा मनाला जातो.
Web Title: Achhe Din Aane Wale Hai slogan of Modi Government.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार